मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Flipkart ची धमाकेदार ऑफर, 11000 रुपयांचा लेटेस्ट फोन केवळ 549 रुपयांत खरेदीची संधी

Flipkart ची धमाकेदार ऑफर, 11000 रुपयांचा लेटेस्ट फोन केवळ 549 रुपयांत खरेदीची संधी

8 एप्रिल रोजी लाँच झालेला हा फोन 13 एप्रिलपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

8 एप्रिल रोजी लाँच झालेला हा फोन 13 एप्रिलपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

8 एप्रिल रोजी लाँच झालेला हा फोन 13 एप्रिलपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे.

नवी दिल्ली, 13 एप्रिल : पॉप्युलर स्मार्टफोन ब्रँड मोटोरोलाने एप्रिलच्या सुरुवातीला नवा स्मार्टफोन Moto G22 लाँच केला होता. आता 13 एप्रिलपासून या स्मार्टफोनचा सेल सुरू झाला आहे. हा फोन फ्लिपकार्टवर (Flipkart Offer) अतिशय स्वस्तात खरेदी करता येईल.

8 एप्रिल रोजी लाँच झालेला हा फोन 13 एप्रिलपासून ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध आहे. फोनची किंमत 10999 रुपये आहे. परंतु Moto G22 च्या फर्स्ट सेलमध्ये हा फोन केवळ 549 रुपयांत खरेदी करता येईल.

Moto G22 चा 4GB RAM आणि 64GB इंटरनल स्टोरेज वेरिएंटची किंमत 10,999 रुपये आहे. फोन खरेदीवेळी ICICI Bank च्या क्रेडिट कार्डचा वापर केल्यास एक हजार रुपयांचा डिस्काउंट मिळेल. त्यामुळे फोनची किंमत 9999 रुपये होईल.

या फोनवर एक्सचेंज ऑफरही आहे. एक्सचेंज ऑफर मिळाल्यास फोनवर तब्बल 10,450 रुपयांची बचत होऊ शकते.महत्त्वाची बाब म्हणजे ही ऑफर तुमच्या फोनच्या स्थितीवर, मॉडेलवर अवलंबून आहे. त्यामुळे या एक्सचेंज ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास 10,999 किमतीचा हा फोन केवळ 549 रुपयांत खरेदी करता येईल.

हे वाचा - 64MP कॅमेरा, 8GB RAM, 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह Oppo F21 Pro भारतात लाँच; काय आहे किंमत आणि फीचर्स

काय आहेत फीचर्स -

Moto G22 स्मार्टफोनला 6.5 इंची आयपीएस-एलसीडी डिस्प्ले दिला आहे. त्याचा रिफ्रेश रेट 90Hz असून, 1600x720 पिक्सल रिझोल्युशन आहे. स्क्रीन-टू-बॉडी रेशो 89.03 टक्के आहे. या फोनमध्ये 5000 mAh क्षमतेची बॅटरी दिली आहे. ती 20 वॉट टर्बो चार्जिंगला सपोर्ट करते. चार्जिंगसाठी यूएसबी टाइप-सी पोर्ट उपलब्ध आहे. विशेष म्हणजे एवढी मोठ्या क्षमतेची बॅटरी असूनही हा स्मार्टफोन (Moto G22 Features) बराच स्लिम आहे.

या स्मार्टफोनमध्ये साइड फिंगरप्रिंट सेन्सर, फेस अनलॉक, अ‍ॅम्बियंट लाइट सेन्सर, अ‍ॅक्सेलरोमीटर सेन्सर असे फीचर्स (Moto G22 Specifications) देण्यात आले आहेत. कनेक्टिव्हिटीसाठी वायफाय, ब्लूटूथ, एफएम रेडिओ, जीपीएस, आणि 3.5mm हेडफोन जॅकही देण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक हीलिओ G37 प्रोसेसर दिला आहे. फोनमध्ये केवळ 4G LTE सिमकार्ड सपोर्ट मिळणार आहे.

हे वाचा - हजार रुपयांत घरा आणता येईल 1 टनचा ब्रँडेड AC, जबरदस्त फीचर्ससह पाहा काय आहे डील

फोनच्या बॅकला क्वाड कॅमेरा सेटअप दिला आहे. यामध्ये प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा (Moto G22 Camera Features) आहे. सोबतच 8 मेगापिक्सेलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर देण्यात आला आहे. सोबतच 2-2 मेगापिक्सेलच्या इतर दोन लेन्सही देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फ्रंट कॅमेरा 16 मेगापिक्सलचा आहे. अवघ्या दहा हजारांमध्ये चांगले फीचर्स देणारा हा बजेट स्मार्टफोन 13 एप्रिलला लाँच होतो आहे.

First published:

Tags: Flipkart, Smartphone, Tech news