मुंबई, 16 ऑक्टोबर : आगामी फेस्टिव्ह सीजन पाहता अनेक ई-कॉमर्स कंपन्यांनी बंपर डिस्काउंटसह सेलची घोषणा केली आहे. अमेझॉनच्या द ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये (Amazon Great Indian Festival)आयफोन 11 वर (iPhone 11) डिस्काउंट जाहीर करण्यात आला आहे. आयफोन 11 आता 47,999 रुपयांत खरेदी करता येऊ शकतो. पेमेंट ऑफर्सशिवाय, ऍपलचा जुना फोन एक्सचेंज करून किंमतीत आणखी सूट मिळवता येणार आहे. ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेल 17 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. पण अमेझॉनच्या प्राईम मेंबर्ससाठी 16 ऑक्टोबरपासून सेलची सुरुवात झाली आहे.
ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक डील उपलब्ध असून आयफोन 11 चांगल्या डिस्काउंटमध्ये घेण्याची संधी आहे. आयफोन 11 फोनच्या 64 जीबी वेरिएंटची स्टिकर प्राईज 47999 रुपये आहे. तर 128 जीबी वेरिएंटची किंमत 52999 रुपये आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये अधिकाधिक 16400 रुपयांची सूट मिळू शकते. फोन मॉडेल आणि फोनच्या कंडिशनवर आधारित व्हॅल्यू निश्चित केली जाणार आहे.
HDFC बँक क्रेडिट कार्डवर 10 टक्के डिस्काउंट -
HDFC बँकच्या क्रेडिट कार्डवरून, 10 टक्के इन्स्टंट डिस्काउंट मिळणार आहे, जो जास्तीत जास्त 1750 रुपये आहे. त्याशिवाय HDFC डेबिट कार्डवरून पेमेंट केल्यास, अधिकाधिक 1250 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.
सेलदरम्यान, 'अमेझॉन पे ICICI बँक क्रेडिट कार्ड'वरून पेमेंट केल्यास प्राईम मेंबर्सला 5 टक्के आणि नॉन प्राईम मेंबर्सला 3 टक्के डिस्काउंट मिळणार आहे. प्राईम युजर्ससाठी अधिकाधिक 2400 रुपये आणि नॉन प्राईम मेंबर्ससाठी 1440 रुपये डिस्काउंट असणार आहे. कॅशबॅक अमेझॉन पे अकाउंटमध्ये मिळणार आहे.
आयफोन 11 फिचर्स -
आयफोन 11 मध्ये 6.1 इंची लिक्विड रेटिना डिस्प्ले आहे. A13 बायोनिक चिप, डिप फ्यूजन आणि नाईट मोडसह 12 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड आणि वाईड ड्युअल कॅमेरा, iOS 14, 3110 mAh बॅटरी, 12 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. तसंच apple iPhone 11 सहा रंगात उपलब्ध आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Iphone