मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Smarphone झाले जुने, आता या नव्या डिव्हाइसचा जमाना!

Smarphone झाले जुने, आता या नव्या डिव्हाइसचा जमाना!

दर 15 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलत असते. आता स्मार्टफोनसुद्धा जुने वाटतील, अशी नवी टेक्नॉलॉजी आणि नवी डिव्हाइस येणार आहेत.

दर 15 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलत असते. आता स्मार्टफोनसुद्धा जुने वाटतील, अशी नवी टेक्नॉलॉजी आणि नवी डिव्हाइस येणार आहेत.

दर 15 वर्षांनी टेक्नॉलॉजी बदलत असते. आता स्मार्टफोनसुद्धा जुने वाटतील, अशी नवी टेक्नॉलॉजी आणि नवी डिव्हाइस येणार आहेत.

नवी दिल्ली, 16 डिसेंबर :  तंत्रज्ञान क्षेत्रात (technology) दर 15 वर्षांत बदल होतात, असं दिसून आलं आहे. सुरुवातील मेनफ्रेम (Mainframe) आलं. त्यानंतर पर्सनल कॅाम्प्युटर (personal Computer) आले. त्यानंतर इंटरनेट (Internet) युग सुरू झालं. मग मोबाईल (mobile) फोन आले आणि आता स्मार्टफोनचा (Smartphone) जमाना आहे. आता स्मार्टफोननंतर कोणतं युग असेल असा प्रश्न सध्या उपस्थित होताना दिसत आहे. कारण स्मार्टफोनसुद्धा बाद व्हायची वेळ जवळ आली आहे. तंत्रज्ञानाचा कल वेगाने बदलताना दिसत आहे. आपल्या बालपणापासून आतापर्यंत विचार केला तर आपण तंत्रज्ञानाच्या अनुषंगाने झालेले मोठे बदल अनुभवले. आपण रेडीओ ते स्मार्टफोन अशा मोठ्या प्रवासाचे साक्षीदार आहोत. आज स्मार्टफोनचा जमाना आहे. फावल्यावेळात अनेक लोक स्मार्टफोन वापरण्यास प्राधान्य देतात. आपण पाहिले तर असे दिसून येते की प्रत्येक 15 वर्षांनी तंत्रज्ञान उद्योगाचा (Technology) ट्रेंड बदलतोय. सुरवातील मेनफ्रेम आला. त्यानंतर पर्सनल कॉम्प्युटर (personal computer) आपण अनुभवला. त्यापश्चात इंटरनेटचा (Internet) जमाना आला. आता हा स्मार्टफोनचा जमाना आहे. आज भलेही जुन्या मॉडेल्सचे महत्व संपुष्टात आले असले तरी या मॉडेल्सने एक काळ गाजवला आहे. प्रत्येकाने गुंतवणूक, नाविन्यता आणि कंपनी निर्माणाच्या जोरावर बाजारात आपले स्वतंत्र स्थान तयार केले. असे असले तरी जुने माडेल्स अजूनही संपुष्टात आलेले नाहीत. मेनफ्रेमला अजूनही मागणी आहे त्यामुळेच आय़बीएम (IBM) अस्तित्वात आहे. पर्सनल कॉम्प्युटरला मागणी कायम असल्याने मायक्रोसॉफ्ट (Microsoft) आपले अस्तित्व टिकून आहे.  परंतु या कंपन्या आता कोणतीही रुपरेषा तयार करीत नाहीत. या कंपन्यामुळे आता कोणतीही गहजब होताना दिसत नाही. मल्टिटच स्मार्टफोन (Multi touch Smartphone) बाजारात दाखल झाल्याला आता 15 वर्षे पूर्ण होतील. आता हे फोन S कर्वच्या पलिकडे गेले आहेत. या शक्य आहे अशा सर्व तंत्रांचा समावेश करण्यात आला आहे. अॅपल (Apple) आणि गुगलने (Google) नेहमीच नवीन उत्पादनांच्या माध्यमातून आपल्याला आश्चर्यचकीत केले आहे. त्यामुळेच आता नव्याने बाजारात दाखल झालेले आयफोन्स पाहता त्यात आपल्याला कोणतेही वेगळेपण जाणवत नाही. कारण तो आता स्थिरतेच्या स्थितीपर्यंत पोहोचला आहे, असे वाटते. ही स्थिती पाहता आता तंत्रज्ञानाची पुढील पिढी कशी असेल?  स्मार्टफोननंतर कोणते नवे तंत्रज्ञान (Technology) येणार?  असे प्रश्न आता विचारले जाऊ लागले आहेत. जागतिक स्तरावरील प्रख्यात तंत्रज्ञानविषयक पत्रकार बेनेडिक्ट इव्हन्स (Benedict Evans) यांनी ब्लागव्दारे याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार VR आणि AR  हे डिव्हाईस मॉडेल्सच (Device Models) आता स्मार्टफोनमध्ये बदल घडवू शकतात. ते स्मार्टफोनपेक्षा अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकत नाहीत मात्र त्यांचा अनुभव घेता येऊ शकतो. आपल्याकडे असे VR डिव्हाईस आहेत की जे गेम आणि सुक्ष्म औद्योगिक वापरासाठी उपयुक्त आहेत. हार्डवेअर (Hardware) आणि सॉफ्टवेअर (Software) यांना जगभरात मागणी वाढू शकते. हे सर्व हार्डवेअरच्या रोडमॅपचे पालन करण्यासाठी आवश्यक आहे किंवा गेम कंन्सोल (Game CONSOL) उद्योगात अधिक सखोल जाण्यासाठी VR मध्ये काही मुलभूत बदल करणे आवश्यक आहे का हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. दुसरीकडे AR Glasses चा विचार केला तर यात मोठ्या संधी दिसत आहेत. वाचन करण्यासाठी आपण चष्म्याप्रमाणे याचा वापर करुन काचा बनवू शकतो का. या चष्माचा वापर केल्यानंतर डोळ्यांच्या पलिकडे अजून वेगळी दुनिया असल्याचे वास्तव आपल्याला भासू शकतो का याचाही विचार करणे यामुळे शक्य होईल. असाच वापर आपण VRचा केला तर तो निश्चितच जादू करणारा ठरेल. परंतु आज असा विचार करणे म्हणजे 2005 मध्ये आपण मल्टिटचचा डेमो (Demo) पाहत होतो तसे असेल. काही गोष्टींसाठी VRचा वापर चांगला ठरु शकेल, पण त्या गोष्टी कोणत्या हा प्रश्न अनुत्तरीतच आहे. अर्थात या पुढील गोष्टींचा अतिविचार करणे मानसिकदृष्टया चुकीचे ठरेल. परंतु जर मेनफ्रेम (Main Frame) -पीसी (Personal Computer) -वेब (Web)-स्मार्टफोन (Smart Phone) असा प्रवास पाहिला तर यासर्वांमागे कोणता घटक कार्यरत आहे, म्हणजेच डाटाबेस-क्लायेंट-सर्व्हर—ओपन सोर्स- क्लाऊड याचा आपण विचार केला पाहिजे. ही प्रगतीची अशी प्रक्रिया आहे की जी जाणवत नाही पण फार महत्वपूर्ण ठरते. हे अगदीच स्पष्ट आहे की आपण मशीन लर्निंगसारख्या तंत्रज्ञान उद्योगाचे पुर्ननिर्माण करीत आहोत आणि बहुधा बऱ्याच उद्योगांनी अशाच पध्दतीचा वापर केला आहे. त्यामुळे आशा आहे की स्मार्टफोननंतर काही नवे तंत्रज्ञान विकसित व्हावे. परंतु नाविन्याची प्रक्रिया सातत्याने सुरुच असते. त्यामुळे मशीन लर्निंगनंतर नवे काही येणार नाही, असा समज चुकीचा वाटतो. मात्र या सर्व जर तरच्या गोष्टी आहेत. त्यामे यापुढील काळ असाच असेल असा समज करुन घेणे चुकीचे ठरेल
First published:

Tags: Apple, Iphone, Phone, Smart phone

पुढील बातम्या