• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • एका मशिनची कलाम, दूध नाही तर दारूपासून बनलीये ही Ice Cream; मार्केटमध्ये अनोखा अविष्कार

एका मशिनची कलाम, दूध नाही तर दारूपासून बनलीये ही Ice Cream; मार्केटमध्ये अनोखा अविष्कार

शून्याखालील तापमानात (Below Zero Ice Cream Machine) आईस्क्रिम बनवणाऱ्या मशीनद्वारे ही कमाल केली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 9 जुलै : आईस्क्रिम खाऊन दारुसारखी नशा चढली तर? हे आतापर्यंत शक्यत नव्हतं. पण आता हे शक्य होणार आहे. Will Rogers या इन्व्हेंटरने Hinkley येथील आपल्या WDS Dessert Station मध्ये एक असं आईस्क्रिम तयार केलं आहे, ज्यात फ्रीजिंग फॉर्ममध्ये अल्कोहल (Alcoholic Ice Cream) आहे. शून्याखालील तापमानात (Below Zero Ice Cream Machine) आईस्क्रिम बनवणाऱ्या मशीनद्वारे त्यांनी ही कमाल केली आहे. Will Rogers यांचं आईस्क्रिम पार्लर आहे. पार्लरमध्ये काम करत असताना त्यांना कॅफेनवालं आईस्क्रिम बनवण्याची कल्पना सुचली. ही कल्पना यशस्वी झाली. त्यानंतर त्यांनी याच तंत्रज्ञानाचा वापर करुन अल्कोहलसह एक अनोखं आईस्क्रिम तयार केलं. त्यांनी यासाठी अनेक दिवस आईस्क्रिम गम्स आणि याला सॉलिड करणाऱ्या केमिकल्सचा वापर केला. परंतु यात ते यशस्वी झाले नाहीत. त्यानंतर त्यांनी NEA जेलद्वारे प्रयोग केला आणि त्यात ते यशस्वी झाले. त्यांनी आता हे पेटेंटही केलं कसं बनवलं अल्कोहोलिक आईस्क्रिम? Will Rogers यांनी सांगितलं, की NEA जेलद्वारे त्यांना अल्कोहल फ्रीज करण्यासाठी मदत मिळाली. त्यांनी सर्व गोष्टी Below Zero Ice Cream Machine मध्ये टाकल्या आणि ते फ्रीज होऊन तयार झालं. या जेलमध्ये अल्कोहल मिक्स झाल्यानंतर तेच आईस्क्रिम म्हणून समोर येतं. Will Rogers यांनी सर्वात आधी लिक्विड नायट्रोजनद्वारे हे फ्रीज करण्याचा प्रयत्न केला. परंतु Below Zero Ice Cream Machine मशिनमध्ये अधिक चांगले रिझल्ट आले आणि आईस्क्रिम कोनमध्ये टाकून खाण्यासाठी तयार झालं. हे आईस्क्रिम खाल्यानंतर अल्कोहलचा तितकाच कंटेंट शरीरात जातो. तुमच्या कामाची बातमी! Driving करताना चालानपासून वाचण्यासाठी डाउनलोड करा हे Apps 30 मिनिटांत होतं तयार - 30 मिनिटाच्या आतच हे आईस्क्रिम तयार होतं. जितका अधिक अल्कोहल कंटेंट असतो, आईस्क्रिम बनवण्यासाठी तितकाच अधिक वेळ लागतो. आईस्क्रिमचा अशाप्रकारे अविष्कार करणाऱ्या Will Rogers यांनी सांगितलं, की त्यांनी हे खास आईस्क्रिम अनेक ईव्हेंट्समध्ये सर्व्ह केलं आहे. हे अनोखं आईस्क्रिम बनवणाऱ्या मशिनची किंमत जवळपास 6 हजार अमेरिकन डॉलर इतकी आहे. त्यांच्या मशिनला FDA अर्थात औषध आणि अन्न प्रशासनाकडून मंजुरीही मिळाली आहे. या अनोख्या आईस्क्रिममध्ये दुधाचा वापर होत नाही. Below Zero हे जगातील पहिलं अल्कोहोलिक आईस्क्रिम नसून याआधीही तीन वर्षांपूर्वी Buzz Pop Cocktails नावाने फळं आणि अल्कोहलपासून अशाप्रकारे आईस्क्रिम तयार करण्यात आलं होतं.
    Published by:Karishma
    First published: