मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

Samsung ते Motorola पर्यंत; 2021 मध्ये लॉन्च झाले हे कमी किंमतीतले दमदार स्मार्टफोन

Samsung ते Motorola पर्यंत; 2021 मध्ये लॉन्च झाले हे कमी किंमतीतले दमदार स्मार्टफोन

चला तर मग 2021 मध्ये लाँच झालेल्या 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

चला तर मग 2021 मध्ये लाँच झालेल्या 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

चला तर मग 2021 मध्ये लाँच झालेल्या 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

नवी दिल्ली, 20 डिसेंबर: 2021 संपायला अवघे काही दिवस उरले असून अनेकजण नवीन वर्षाच्या तयारीत व्यस्त आहेत. वर्ष 2021 मध्ये फोन बनवणाऱ्या विविध कंपन्यांनी ग्राहकांचा विचार करून बजेट फोनपासून ( budget phones ) ते प्रीमियम फोनपर्यंत ( premium phones ) विविध प्रकारचे फोन लाँच केले. यावर्षी मोटोरोला ( Motorola), सॅमसंग ( Samsung ), रियलमी ( Realme ) या लोकप्रिय कंपन्यांनी ( popular companies ) देखील 10 हजारांपेक्षा कमी किमतीचे फोन लाँच ( smartphone launched ) केले आहेत. चला तर मग 2021 मध्ये लाँच झालेल्या 10 हजार रुपयांपेक्षा कमी किंमत असलेल्या स्मार्टफोनबद्दल जाणून घेऊया.

सॅमसंग गॅलेक्सी F02S

सॅमसंगच्या ( Samsung Galaxy F02S ) या फोनची किंमत 9 हजार 499 रुपये आहे. फोनमध्ये इनफिनिटी व्ही नॉच डिझाइन सोबत 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले दिला आहे. प्रोसेसर म्हणून या फोनमध्ये क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 450 चिपसेट दिला आहे. 3GB रॅम व 32GB स्टोरेज आणि 4GB रॅम व 64GB स्टोरेज या दोन प्रकारात हा फोन येतो. फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी असून ती 15W चार्जिंग सपोर्टसह येते.

हेही वाचा-  वर्षभर फ्रीमध्ये घेऊ शकता Netflix, Amazon सारख्या OTT चा आनंद, पाहा कसं मिळेल सब्सक्रिप्शन

इनफिनिक्स हॉट 11S

या फोनची किंमत 10 हजार 499 रुपये आहे. इनफिनिक्स हॉट 11S ( Infinix Hot 11S ) फोनमध्ये, कंपनी 1080×2408 पिक्सेल रिझोल्यूशन सह 6.78 इंच फुल एचडी प्लस डिस्प्ले देत आहे. 90 Hz रिफ्रेश असलेल्या या डिस्प्लेचा ॲस्पेक्ट रेशो 20.5:9 आहे. कंपनीचा हा फोन 4GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज प्रकारामध्ये येतो. ग्राहक मायक्रो एसडी कार्डद्वारे फोनचे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवू शकतात. इनफिनिक्स हॉट 11S च्या 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरियंटची किंमत 10,499 रुपये आहे.

मोटो E7 Plus

मोटो E7 Plus (Moto E7 Plus) फोनची किंमत 9 हजार 499 रुपये आहे. फोनमध्ये 6.5 इंचाचा मॅक्स व्हिजन (Max Vision) एचडी प्लस डिस्प्ले आहे. फोनमध्ये क्वॉलकॉमचा 1.8GHz स्पीड स्नॅपड्रॅगन 460 प्रोसेसर आणि ग्राफिक्ससाठी एड्रेनो (Adreno) 610 GPU आहे. ग्राहक हा फोन मिस्टी ब्लू ( Misty Blue ) आणि ट्वायलाइट ऑरेंज ( Twilight Orange ) कलर व्हेरियंटमध्ये खरेदी करू शकतात. फोनमध्ये 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज आहे, जे मेमरी कार्डच्या मदतीने वाढवता येते. 5000mAh बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे.

नोकिया C20 Plus (किंमत 8,999)

नोकिया कंपनीचा C20 Plus ( Nokia C20 Plus ) या फोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. या फोनमध्ये 6.5 इंचाचा एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचा ॲस्पेक्ट रेशो 20:9 आहे. फोनमध्ये ऑक्टा-कोर Unisoc SC9863A प्रोसेसर देण्यात आला आहे. हँडसेटमध्ये 3GB रॅम आणि 32GB इनबिल्ट स्टोरेज आहे. मायक्रो एसडी कार्डद्वारे स्टोरेज 256GB पर्यंत वाढवता येते. या नोकिया फोनमध्ये अँड्रॉइड 11 गो आधीपासून इन्स्टॉल आहे.

हेही वाचा-  'Amazon' वर जबरदस्त सेल; इतक्या कमी किंमतीत मिळणार स्मार्टफोन

 रियलमी Narzo 30A

रियलमी च्या Narzo 30A ( Realme Narzo 30A ) फोनची किंमत 8 हजार 999 रुपये आहे. फोनमध्ये 6.5 इंच एचडी प्लस डिस्प्ले आहे, ज्याचे रिझोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. डिस्प्लेची स्टाइल वॉटर ड्रॉप नॉच आहे. या फोनमध्ये मीडिया टेक हीलिओ G85 प्रोसेसर आहे. स्मार्टफोनमध्ये 3GB/4GB रॅम आणि 32GB/64GB स्टोरेज पर्याय आहे. फोनमध्ये 6000mAh बॅटरी असून ती 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट करते.

First published:

Tags: Smartphones