मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

तुमच्या जुन्या फोन नंबरवरून चोरी केला जाऊ शकतो पर्सनल डेटा; सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता

तुमच्या जुन्या फोन नंबरवरून चोरी केला जाऊ शकतो पर्सनल डेटा; सुरक्षितता धोक्यात येण्याची शक्यता

कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.

कॉन्टॅक्ट लिस्ट पाहण्यासाठी गुगलच्या होम पेजवर उजव्या बाजूला असलेल्या Gmail जवळील Contacts ऑप्शनवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर स्क्रीनवर तुमचे कॉन्टॅक्ट नंबर दिसतील. या सर्व नंबर्सचा बॅकअपही घेता येऊ शकतो. इथे कॉन्टॅक्ट नंबर डिलीट करण्याचाही ऑप्शन दिला जाईल.

तुम्ही तुमचा फोन नंबर बदलला असेल, तरीदेखील त्या जुन्या फोन क्रमांकावरून (Old Mobile Number) तुमची माहिती सहज उपलब्ध होते.

नवी दिल्ली, 6 मे : आजचं युग हे तंत्रज्ञानाचं (Technology Era) युग मानलं जातं. या तंत्रज्ञानामुळे अवघं जग अगदी जवळ आलं आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे आयुष्य अगदी सोपं होत आहे, पण त्याचवेळी काही धोकेही निर्माण होत आहेत. डिजिटल व्यवहारांचं प्रमाण वाढल्यानं आर्थिक फसवणूक आणि घोटाळेही वाढत आहेत. अगदी गोपनीय माहिती देखील (Personal Data) चोरली जात आहे आणि त्याचा वापर करून फसवणूक केली जात आहे. सध्या सर्रास वापरलं जाणारं साधन म्हणजे मोबाइल (Mobile). आजकाल कोणाकडे मोबाइल नाही असं होणं अशक्य आहे. इंटरनेटचा सर्वत्र झालेला प्रसार, स्वस्तात उपलब्धता आणि स्मार्टफोनचा वाढता वापर यामुळे प्रत्येक गोष्ट मोबाइलमध्ये स्टोअर केलेली असते. यामुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ही माहिती मिळवून फसवणूक केली जाते. तुम्ही तुमचा फोन नंबर बदलला असेल, तरीदेखील त्या जुन्या फोन क्रमांकावरून (Old Mobile Number) तुमची माहिती सहज उपलब्ध होते. जुन्या नंबरशी संबंधित डेटा मिळवणं सोपं - समजा काही कारणांनी तुम्ही तुमचा आधीचा मोबाईल नंबर बदलला आण नवीन नंबर घेतलात, तर दूरसंचार कंपनी तुमचा जुना नंबर काही काळानंतर दुसऱ्या ग्राहकाला देते. अशावेळी नवीन ग्राहकाला त्या जुन्या नंबरशी संबंधित डेटा मिळवणं सोपे असतं. यामुळे आपली गोपनीयता (Privacy) आणि सुरक्षितता धोक्यात येऊ शकते.

(वाचा - सेकंड हँड कार खरेदी करताय? RC मध्ये हा पॉईंट तपासाच; अन्यथा येईल मोठी समस्या)

गोपनीयतेला सर्वात मोठा धोका - अमेरिकेतील प्रिन्सटन विद्यापीठातील संशोधकांच्या अहवालानुसार, आपल्या जुन्या क्रमांकाचा पुनर्वापर करण्याची पद्धतच सुरक्षा आणि गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करते. अनेकदा आपण नवीन नंबर आपल्या सर्व डिजिटल खात्यात अपडेट करत नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी आपला जुना नंबर तसाच राहतो. बँकिंग सुविधांमध्ये आपण नवा नंबर अपडेट केला, पण ई-कॉमर्स अ‍ॅपमध्ये आपला जुनाच नंबर असेल, तर नवीन युजरला तुम्हाला पाठवण्यात येणारे सर्व संदेश मिळत राहतात. याचं एक उदाहरण या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. एका पत्रकाराने एक नवीन मोबाइल नंबर घेतला, त्यानंतर त्याच्या मोबाईलवर रक्त चाचण्या आणि स्पा संदर्भात मेसेज येऊ लागले. ओटीपी मेसेजेसही येतात - या संशोधनात एका आठवड्यासाठी 200 पुनर्वापराचे मोबाईल नंबर तपासण्यात आले. त्याचे परिणाम अतिशय धक्कादायक होते. त्या नंबर्सवर जुन्या युजरसाठीचे कॉल आणि संदेश येत होते. यामध्ये अनेकदा ऑथेंटिकेशन, ओटीपीचे संदेशही आले. या अभ्यासातून संशोधकांनी आठ धोक्यांची एक यादी तयार केली. यामध्ये फिशिंग हल्ल्यांपासून ते अलर्ट, वर्तमानपत्रं, मोहिमा आणि रोबोकॉलसाठी साईन अप करण्यापर्यंतच्या अनेक गोष्टींचा समावेश आहे.
First published:

Tags: Smartphone, Tech news

पुढील बातम्या