दक्षिण आफ्रिकेत धावणार 'मेड इन इंडिया' कार, 600 गाड्या चेन्नईतून एक्सपोर्ट

फ्रेंच कंपनी Renault ने शुक्रवार को मेड-इन-इंडिया (Made in India) सात सीटर एमपीवी ट्रायबर (7 Seater MPV Triber) दक्षिण आफ्रिकेमध्ये लाँच केली.

फ्रेंच कंपनी Renault ने शुक्रवार को मेड-इन-इंडिया (Made in India) सात सीटर एमपीवी ट्रायबर (7 Seater MPV Triber) दक्षिण आफ्रिकेमध्ये लाँच केली.

  • Share this:
    मुंबई, 16 फेब्रुवारी : फ्रेंच कंपनी Renault ने शुक्रवार को मेड-इन-इंडिया (Made in India) सात सीटर एमपीवी ट्रायबर (7 Seater MPV Triber) दक्षिण आफ्रिकेमध्ये लाँच केली. कंपनीने डिसेंबर 2019मध्ये चेन्नईच्या मॅन्युफॅक्चरिंग प्लँटमधून (Chennai Manufacturing Plant of Renault Triber) या मॉडेलला एक्सपोर्ट केल्यानंतर आफ्रिकेत ही गाडी लाँच करण्यात आली आहे. गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात या गाडीचे 30 हजार युनिट्स भारतीय बाजारात विकले गेले होते. आता दक्षिण आफ्रिकेत दर महिन्याला 300 युनिट्स विकण्याचा कंपनीचा मानस आहे. दक्षिण आफ्रिकेसोबतच संपूर्ण आफ्रिकेत ट्रायबरचे युनिट्स विकण्याचा कंपनीचा मानस आहे. Renault India ऑपरेशन्सचे सीईओ आणि एमडी वेंकटराम मामिल्लापल्ले यांनी दिलेल्या माहितीनुसार, ट्रायबर या मॉडेलच्या 600 गाड्या चेन्नईमधून आफ्रिकेत दाखल झाल्या आहेत. रेनॉल्टचं क्विड (Renault Kwid) मॉडेल आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात यशस्वी झालं होतं. त्यामुळे हे मॉडेल देखील ग्राहकांच्या पसंतीस उतरेल अशी कंपनीची इच्छा आहे. (हेही वाचा- स्टॉक संपवण्यासाठी HYUNDAI गाड्यांवर खास ऑफर, होऊ शकतोा 2.50 लाखांपर्यंतचा फायदा) मामिल्लापल्ले यांच्या माहितीनुसार, ‘याठिकाणचे रस्ते पाहून अशी आशा आहे की ट्रायबर याठिकाणी चांगला परफॉर्म करेल. दर महिन्याला 300 गाड्या विकण्याचा आमचा मानस आहे. कंपनीकडून या गाडीचं AMT (ऑटोमेटेड मॅन्युअल ट्रान्समिशन) वर्जन देखील आणणार आहे.' ट्रायबरची दक्षिण आफ्रिकेतील किंमत 1 लाख 64 हजार 900 रँड आहे. गेल्या वर्षी तब्बल 13 हजार युनिट्स चेन्नई प्लँटमधून एक्सपोर्ट करण्यात आली होती. चेन्नईतील या प्लँटची क्षमता दरवर्षाला 4.8 लाख युनिट्स इतकी आहे. अन्य बातम्या RBIचे आर्थिक वर्ष बदलण्याची शक्यता, बोर्डाने केंद्राकडे केली शिफारस 'या' बँकांमध्ये बचत खातं असल्यास होणार फायदा, 7 टक्क्यांपर्यंत मिळणार व्याज 23 जणांना मिळाला 'ड्रीम जॉब', 9 तास झोपण्याचे मिळणार 1 लाख
    First published: