• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • 'महिला दिनानिमित्त Adidas कडून मोफत शूज?' काय आहे WhatsApp च्या या मेसेज मागचं सत्य

'महिला दिनानिमित्त Adidas कडून मोफत शूज?' काय आहे WhatsApp च्या या मेसेज मागचं सत्य

व्हॉट्सअ‍ॅप हा लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यावर अनेक मेसेजेस सत्यता न पडताळताच लोकांकडून फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे अशा घोटाळेबाजांचं फावतं. सध्या असाच एक फॉरवर्डेड मेसेज (Forwarded Message) व्हायरल आहे.

  • Share this:
नवी दिल्ली, 8 मार्च: आज आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त (International Women's Day) सोशल मीडियावर अनेकांकडून शुभेच्छा देत असताना, त्यातच काही घोटाळेबाज आणि हॅकर्स (Hackers) व्हॉट्सअ‍ॅप ऑफरच्या (Fake Whatsapp Offer) नावाखाली ऑनलाइन फ्रॉड करत आहेत. त्यापासून सावध राहण्याची गरज आहे. 'झी बिझनेस'ने त्याबाबतचं वृत्त दिलं आहे. व्हॉट्सअ‍ॅप हा लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. त्यावर अनेक मेसेजेस सत्यता न पडताळताच लोकांकडून फॉरवर्ड केले जातात. त्यामुळे अशा घोटाळेबाजांचं फावतं. सध्या असाच एक फॉरवर्डेड मेसेज (Forwarded Message) व्हायरल आहे. 'महिला दिनानिमित्त Adidas कडून मोफत शूजची ऑफर आहे,' असा तो मेसेज आहे. मात्र तो मेसेज खोटा आहे. त्यातील लिंकवर क्लिक करू नये, तसंच तो फॉरवर्डही करू नये, असं आवाहन करण्यात आलं आहे. अशा प्रकारचे कोणतेही फॉरवर्डेड मेसेजेस व्हॉट्सअ‍ॅपवर किंवा अन्य कोणत्याही सोशल मीडियावर (Social Media) आले, तरी लोकांनी त्यावर विश्वास ठेवू नये, असंही आवाहन करण्यात आलं आहे. Adidas कडून मोफत शूज देण्यात येत असल्याचा मेसेज खोटा आहे.

(वाचा - Women's Day Special:'ती'च्या कार्याला अनोखा सलाम;आनंद महिंद्रांनी शेअर केलाVIDEO)

Adidas सारख्या लोकप्रिय ब्रँडकडून जर खरंच अशी काही ऑफर आली असती, तर त्यांनी त्यांच्या कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा अधिकृत सोशल मीडिया हँडल्सवर ती आधी प्रसिद्ध केली असती. लिंक बारकाईने पाहिली, तर लक्षात येईल, की त्यामध्ये Adidas चं स्पेलिंग चुकीचं लिहिण्यात आलं आहे. तसंच, ती लिंक त्यांच्या अधिकृत वेबसाइटची नसल्याचंही लक्षात येतं. त्यामुळे त्या लिंकवर क्लिक करू नये. तरीही त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही त्या पेजवर गेलात, तर त्या लँडिंग पेजवर Adidas चा नव्हे, तर व्हॉट्सअ‍ॅपचा लोगो देण्यात आला आहे. त्यामुळे अशा फ्री गिफ्टच्या ऑफर्सच्या मेसेजवर विश्वास ठेवू नये. अशा संशयास्पद वेबसाइट्सवर काहीही माहिती नसते. केवळ काही फोटो असतात.

(वाचा - Women’s Day 2021:Facebookसाठी वापरा या सेफ्टी टिप्स,असं करा आपलं अकाउंट सुरक्षित)

तसंच संबंधित वेबसाइटवर डेव्हलपरचं नाव © 2021 adidas America Inc. असं देण्यात आलं आहे. अदिदासच्या अधिकृत वेबसाइटवर डेव्हलपरचं नाव ©2020 shop.adidas.co.in असं आहे. या सगळ्या गोष्टी लक्षात घेतल्या, तर हा फसवणूक करणारा मेसेज असल्याचं स्पष्ट होतं. त्यामुळे केवळ याच नव्हे, तर कोणत्याही फॉरवर्डेड मेसेजमध्ये फ्री गिफ्टचे दावे केलेले असतील, तर कृपया त्यावर क्लिक करू नये आणि ते फॉरवर्डही करू नये. त्यामुळे खूप मोठं नुकसान टळू शकेल.
First published: