• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • iPhone बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये 2 लाख वॅकेन्सी, जाणून घ्या डिटेल्स

iPhone बनवणाऱ्या फॅक्टरीमध्ये 2 लाख वॅकेन्सी, जाणून घ्या डिटेल्स

फॉक्सकॉन कंपनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस iPhone 13 लाइनअपच्या निर्मितीसाठी 2 लाख लोकांना कामावर ठेवणार असल्याचा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 29 ऑगस्ट : अ‍ॅपलच्या iPhone 13 मुळे लाखो लोकांच्या रोजगाराबाबतची चांगली बातमी समोर आली आहे. iPhone 13 च्या प्रोडक्शनसाठी फॉक्सकॉन कंपनी आणखी 2 लाख कर्मचाऱ्यांना कामावर ठेवणार असल्याची माहिती आहे. अ‍ॅपल सप्लायर आणि जगातील सर्वात मोठी कॉन्ट्रॅक्ट इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरर फॉक्सकॉन कंपनी सप्टेंबर महिन्याच्या अखेरीस iPhone 13 लाइनअपच्या निर्मितीसाठी 2 लाख लोकांना कामावर ठेवणार असल्याचा दावा एका रिपोर्टमधून करण्यात आला आहे. 2 लाख लोकांना नोकरीची संधी - साउथ चायना मॉर्निंग पोस्टनुसार, पुढील महिन्यात iPhone 13 लाइनअपच्या अपेक्षित लाँचपूर्वी चीनी शहर झेंग्झॉमध्ये फॉक्सकॉनच्या iPhone कारखान्यात 2,00,000 अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. फॉक्सकॉनच्या झेंग्झॉ प्लान्टचे महाव्यवस्थापक वांग जू यांनी सांगितलं, की सप्टेंबर अखेरीस नवीन कर्मचारी नियुक्त केले जातील. झेंग्झॉ फॅसिलिटी जगातील सर्वात मोठी आयफोन फॅक्ट्री आहे, ज्यात 3,50,000 असेंबली लाइनचे कर्मचारी राहू शकतात. तसंच दररोज 5,00,000 नव्या आयफोनची निर्मिती करू शकतात.

  iPhone 13 खरेदी करणाऱ्यांसाठी Good News, या तारखेला करता येणार Pre-Order; पाहा काय आहे खास

  iPhone 13 मध्ये काय असेल खास? रिपोर्टनुसार, iPhone 13 मध्ये iPhone 13 Mini 5.4 इंची, iPhone 13 6.1 इंची, iPhone 13 Pro 6.1 इंची आणि iPhone 13 Pro Max 6.7 इंची असू शकतो. आयफोन 13 च्या प्रो मॉडेलमध्ये wifi 6E असू शकतं. तसंच अपकमिंग सीरिज 25W फास्ट जनरेशन टेक्निकला सपोर्ट करेल.

  Truecaller विसरा,आता वापरा देशी BharatCaller App;प्रायव्हसीसह जबरदस्त वैशिष्ट्यं

  iPhone 13 सीरिजचं 14 सप्टेंबर 2021 रोजी लाँचिंग होणार आहे. 14 सप्टेंबर रोजी अ‍ॅपलच्या इव्हेंटमध्ये iPhone 13, iPhone 13 Pro, iPhone 13 Pro Max आणि iPhone 13 mini स्मार्टफोन लाँच होऊ शकतात. 14 सप्टेंबर लाँचिंगनंतर 17 सप्टेंबरपासून प्री-बुकिंग सुरू होणार असून, 24 सप्टेंबरपासून सर्व फोनची विक्री सुरू केली जाईल, अशी माहिती आहे.
  Published by:Karishma
  First published: