दीड रुपयाच्या सेन्सरची कमाल! मोबाईल सांगणार जेवण खराब झाले की नाही

दीड रुपयाच्या सेन्सरची कमाल! मोबाईल सांगणार जेवण खराब झाले की नाही

पॅकेज फूड खरेदी केल्यानंतर अनेकदा त्यावर एक्स्पायरी डेट संपत आल्याचे दिसताच ते खराब झाले असेल असं समजून फेकून दिलं जातं.

  • Share this:

लंडन, 30 ऑगस्ट : जेवण किंवा खाण्याचे पदार्थ बाहेरून मागवले जातात तेव्हा त्याच्यावर असलेली एक्स्पायरी डेट पाहून लोक ती संपत आली असेल तरी पदार्थ फेकून दिले जातात. लोकांना भीती असते की पदार्थ खराब झाले असतील. काही वेळा ते वास घेऊन खराब झाले आहेत किंवा नाहीत हे पाहिलं जातं. आता याची गरज पडणार नाही. एक असा सेन्सर आला आहे जो पदार्थ खराब झालेत की नाही ते सांगेल. स्मार्टफोनला जोडता येणारा असा हा सेन्सर इको फ्रेंडली असेल. हा सेन्सर लावून पॅकेज फूड खराब झाले आहे की नाही हे पाहता येईल. यामुळे खराब न झालेले पदार्थ वाया जाणार नाहीत. लंडनमधील इम्पीरियल कॉलेजने तयार केलेल्या सेन्सरमुळे खाद्यपदार्थांना खराब करणाऱ्या अमोनिया आणि ट्रायमिथायलामाइनचे प्रमाण समजते. यामुळं पदार्थ खराब झाला आहे की नाही हे समजतं. या सेन्सरला पेपर आधारित इलेक्ट्रिकल गॅस सेन्सर असं नाव देण्यात आलं आहे.

(वाचा : शरद पवार यांचे जवळचे नातेवाईक राष्ट्रवादी सोडण्याच्या स्थितीत)

ब्रिटनमध्ये एक तृतियांश लोक पॅक केलेले खाण्याचे पदार्थ केवळ एक्स्पायरी डेट जवळ आली आहे म्हणून टाकून देतात. यामध्ये 42 लाख टन अन्न खाण्यालायक असतं. बाजारात याआधी काही सेन्सर पहिल्यापासून उपलब्ध असले तरी या सेन्सरचं खास वैशिष्ठ्य म्हणजे योग्य अनुमान काढता येतं आणि स्वस्तही आहे. प्रयोगशाळेत जेव्हा सेन्सरचा वापर केला तेव्हा जेवण खराब करणाऱ्या वायूंना या सेन्सरनं लगेच ओळखलं.

(वाचा : '...या लोकांची लायकी नाही',पंकजा मुंडेंचं अजित पवार-धनंजय मुंडेंवर टीकास्त्र)

संशोधकांनी म्हटलं आहे की, या सेन्सरमुळे पॅकेज फूडवर एक्स्पायरी डेट लावण्याची गरज नाही. हा सेन्सर लावल्यास ते अचूक आणि विश्वसनिय असेल. तसेच ग्राहकांना खाद्यपदार्थही स्वस्तात मिळतील. डॉ. फिरात गुडेर यांनी सांगितलं की, हा एकमेव सेन्सर आहे जो व्यावसायिक स्तरावर वापरता येईल. याची किंमत फक्त दीड रुपया असल्यानं वस्तुच्या किंमतीतही फारसा फरक पडणार नाही.

(वाचा :इमारतीवरून उडी मारून तरुणीची आत्महत्या,बॉलिवूडमध्ये करायचं होतं करिअर; पण...)

'फक्त डोळ्यांनी पाहून इमारती ठरवल्या धोकादायक', पोलखोल करणारा SPECIAL REPORT

First published: August 24, 2019, 9:54 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading