मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Flying Bike : जपानमध्ये मिळणार उडणारी बाईक; कंपनीकडून बुकिंगही सुरू

Flying Bike : जपानमध्ये मिळणार उडणारी बाईक; कंपनीकडून बुकिंगही सुरू

जपानी नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरत असलेली ही उडणारी बाईक एएलआय टेक्नोलॉजिज (A.L.I. Technologies) या टोकियोतल्या ड्रोन स्टार्टअपने तयार केली आहे

जपानी नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरत असलेली ही उडणारी बाईक एएलआय टेक्नोलॉजिज (A.L.I. Technologies) या टोकियोतल्या ड्रोन स्टार्टअपने तयार केली आहे

जपानी नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरत असलेली ही उडणारी बाईक एएलआय टेक्नोलॉजिज (A.L.I. Technologies) या टोकियोतल्या ड्रोन स्टार्टअपने तयार केली आहे

    टोकियो, 27 ऑक्टोबर : सध्या भारतात इलेक्ट्रिक वाहनं (Electric Vehicles) विशेष चर्चेत आहेत. पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून या वाहनांचा वापर वाढावा, असं सरकारचं धोरण देखील आहे. जपान (Japan) हा देश तंत्रज्ञानात अधिक प्रगत आहे. तेथील बुलेट ट्रेन असो किंवा चालकविरहित वाहनांचा वापर असो, प्रत्येक गोष्टीत तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर होताना दिसतो. सध्या देखील जपानमध्ये तंत्रज्ञानाच्या अनोख्या आविष्काराची चर्चा सुरू आहे. त्याला कारण ठरली आहे उडणारी बाईक (Flying Bike). सध्या ही उडणारी बाईक जपानी नागरिकांसाठी औत्सुक्याचा विषय ठरत आहे. जपानमधल्या एका स्टार्टअपने (Japan Startup) ही हॉवर बाइक म्हणजेच उडणारी बाइक सादर केली आहे. त्याविषयीचं वृत्त `आज तक`ने दिलं आहे.

    जपानी नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरत असलेली ही उडणारी बाईक एएलआय टेक्नोलॉजिज (A.L.I. Technologies) या टोकियोतल्या ड्रोन स्टार्टअपने तयार केली आहे. Xturismo Limited Edition असं या बाईकचं नामकरण करण्यात आलं आहे. ही बाईक 40 मिनिटं हवेत उडू शकते, असा दावा कंपनीनं केला आहे. विशेष म्हणजे एएलआय टेक्नोलॉजिजने 26 ऑक्टोबरपासून या बाईकचं बुकिंगही सुरू केलं आहे. पहिल्या टप्प्यात कंपनी केवळ 200 फ्लाईंग बाईक्सची निर्मिती करणार आहे.

    याबाबत कंपनीचे चीफ एक्झिक्युटिव्ह डायसुके कातानो यांनी सांगितलं, `या स्टार्टअपला मित्सुबिशी इलेक्ट्रिक (Mitsubishi Electric) आणि क्युसेरा (Kyocera) यांचं साह्य मिळालं आहे. या बाईकचं प्रात्यक्षिक माउंट फुजीनजीक (Mount Fuji) घेण्यात आलं आहे. प्रात्यक्षिकावेळी जमिनीपासून काही मीटर उंचीवर हवेत या बाईकनं एक लहान उड्डाण केलं होतं. भविष्यकाळात या बाईकचा वापर ठराविक ठिकाणीच केला जाणार आहे. जपानमधल्या वाहतुकीच्या रस्त्यांवर या बाईकला परवानगी दिली जाणार नाही. या उडणाऱ्या बाईकचा वापर प्राधान्याने बचाव पथक अवघडस्थळी पोहोचण्यासाठी करेल.`

    विशेष म्हणजे या उडणाऱ्या बाईकचा वेग 100 किलोमीटर प्रति तासपर्यंत ( 62mph) असू शकतो. यात एक कन्व्हेन्शनल इंजिन आणि मोटारला पॉवर देण्यासाठी चार बॅटरीज समाविष्ट असतील. या बाइकची किंमत 77.7 दशलक्ष येन म्हणजेच सुमारे 5.09 कोटी रुपये ठेवण्यात आली आहे.

    आतापर्यंत जमिनीवर किंवा आकाशात फिरण्याचा पर्याय होता. परंतु, आम्ही आता फिरण्यासाठी एक नवी पद्धत आणत आहोत. ही हॉवर बाइक काळ्या आणि लाल रंगात उपलब्ध असेल. तसंच दिसायला ती सामान्य बाइकसारखीच असेल. तिच्या वरील बाजूस प्रोपेलर्स देण्यात आले आहेत,` असं डायसुके कातानो यांनी रॉयटर्सशी बोलताना सांगितलं.

    First published:

    Tags: Bike riding, Japan, Technology