नवी दिल्ली, 19 फेब्रुवारी : ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने
(Flipkart) क्विक डिलीवरी सर्विस
(Quick Delivery Service) सुरू केली आहे. फ्लिपकार्ट क्विक डिलीवरी सर्विस नावाने सुरू करण्यात आलेल्या या सुविधेद्वारे केवळ 45 मिनिटांत किराण सामानाची डिलीवरी केली जाणार आहे. ग्राहकांना किराणा सामान लवकरात लवकर पोहोचवण्यासाठी Quick Delivery Service द्वारे डिलीवरीचा वेळ 90 मिनिटांवरुन कमी करुन 45 मिनिटं केला आहे. ही सर्विस सध्या बँगलोरमध्ये उपलब्ध आहे. पुढील महिन्यात ही सर्विस इतर शहरांत उपलब्ध केली जाणार आहे.
फ्लिपकार्टचा हा निर्णय अशावेळी आला आहे, ज्यावेळी Blinkit, जेप्टो, Swiggy Instamart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांनी केवळ 15-20 मिनिटांत किराण सामान पोहोचवण्याचा प्रयत्न सुरू केला. परंतु फ्लिपकार्टने 15-20 मिनिटांत डोर डिलीवरी करणं परफेक्ट मॉडेल नसल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे फ्लिपकार्ट क्विक सर्विसने किराणा सामानाच्या डिलीवरीचा वेळ 45 मिनिटं ठरवला आहे.
फ्लिपकार्टचे सीईओ कल्याण कृष्णमूर्ती यांनी सांगितलं, की त्यांचं टार्गेट आपल्या ग्राहकांना क्वालिटी सर्विस ऑफर करणं आहे, जेणेकरुन चांगल्या व्यवसायाला चालना मिळेल.
Flipkart ने 45 मिनिटं आणि 90 मिनिटांची क्विक सर्विस आणली. 90 मिनिटांची डिलीवरी सर्विस सध्या 14 शहरांत उपलब्ध आहे. 2022 च्या अखेरपर्यंत फ्लिपकार्टने ही सर्विस 200 शहरांत वाढवण्याची योजना आखली आहे.
फ्रूट डोर डिलीवरी -
कंपनीकडून फ्रेश व्हेजिटेबल सर्विसही दिली जाते. सध्या ही सर्विस हैदराबाद आणि बँगलोरमध्ये उपलब्ध आहे. लवकरच कंपनीची आपली ही फ्रूट डोर डिलीवरी सर्विस
(Fruits Delivery) इतर शहरांतही वाढवण्याची योजना आहे.
मागील वर्षी कंपनीने Flipkart Quick लाँच केलं होतं. या सर्विसद्वारे किराणा, ताजे प्रोडक्ट्स, डेअरी, मांस, मोबाइल फोन, इलेक्ट्रॉनिक्स सामान, स्टेशनरी आणि घरगुती सामानसारख्या कॅटेगरीतील 2000 हून अधिक प्रोडक्ट्स ग्राहकांसाठी उपलब्ध करण्यात आले. ग्राहक आपले प्रोडक्ट्स निवडू शकतात आणि डिलीवरीसाठी पुढील 90 मिनिटं किंवा 2 तासांचा स्लॉट बुक करू शकतात. सकाळी 6 वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत डिलीवरी मिळू शकते. यासाठी कमीत-कमी 29 रुपये डिलीवरी चार्ज द्यावा लागतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.