खूशखबर! Flipkart मध्ये 5 हजार जणांना मिळणार नोकरी

खूशखबर! Flipkart मध्ये 5 हजार जणांना मिळणार नोकरी

फ्लिपकार्टने त्यांची दोन नवी कार्यालये भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 15 जानेवारी : वॉलमार्टने खरेदी केलेली ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टने त्यांची दोन नवी कार्यालये भारतात सुरू करण्याची घोषणा केली आहे. हरियाणामध्ये दोन नवीन गोदामे उभारण्यात आली असून त्याची माहिती मंगळवारी फ्लिपकार्टकडून देण्यात आली. त्यामुळे जवळपास 5 हजार नोकऱ्यांची संधी उपलब्ध होणार आहे.

फ्लिपकार्टने म्हटलं की, नऊ लाख वर्ग फूट आवारात असलेल्या या गोदामामध्ये फ्लिपकार्ट उत्तर भारतात चांगल्या प्रकारे सेवा देऊ शकतो. सध्या गोदामांची संख्या कमी असल्याने ग्राहकांना सेवा पुरवण्यात अडचणी येत होत्या. यामुळे कंपनीची क्षमता आणखी वाढली आहे.

फ्लिपकार्ट : इंडस्ट्री - ई काॅमर्स, कर्मचाऱ्यांची संख्या - 13,900, भारतातली मुख्य आॅफिसेस - नवी दिल्ली, बंगळुरू, कामाची क्षेत्र - प्राॅडक्ट मॅनेजमेंट, शिक्षण, इंजिनियरिंग (Image: Reuters)

हरियाणात आता फ्लिपकार्टची एकूण 12 गोदामं झाली आहेत. यामद्ये इलेक्ट्रिकल वस्तू, मोबाइल, कपडे, इतर लहान वस्तू, किराणा माल, फर्नीचर यांचा समावेश आहे.

स्वस्तात मस्त! सर्वात लहान स्मार्टफोन लाँच, 7 दिवस बॅटरी बॅकअपसह 14 खास फीचर्स

नव्या दोन गोदामांची उभारणी केल्याने राज्यात 5 हजारहून अधिक नोकऱ्यांची निर्मिती होणार आहे. सध्या हरियाणात 10 हजारांपेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळाला आहे.

ड्रोनने कॅमेरा उडवण्याआधी 'हे' करा नाहीतर होऊ शकते अटक, केंद्राने दिले नवे आदेश

शुभेच्छा देणाऱ्या मेसेजमधून आलाय VIRUS, तुमचाही मोबाईल होऊ शकतो हॅक

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Flipkart
First Published: Jan 16, 2020 09:20 PM IST

ताज्या बातम्या