Home /News /technology /

Flipkart Offer: 15 हजारांचा रेडमी 10 स्मार्टफोन अवघ्या 750 रुपयांत; ऑफर मिस होण्याआधी चेक करा डिटेल्स

Flipkart Offer: 15 हजारांचा रेडमी 10 स्मार्टफोन अवघ्या 750 रुपयांत; ऑफर मिस होण्याआधी चेक करा डिटेल्स

Redmi 10 च्या 4GB+64GB व्हेरियंट फोनची किंमत 14,999 रुपये आहे. या फोनवर फ्लिपकार्टवर सध्या तब्बल 26% डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त 10,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता.

    मुंबई, 1 ऑगस्ट: फ्लिपकार्टवर (Flipkart) बंपर सेल सुरू झाला आहे. या सेलमध्ये तुम्ही कपडे, ज्वेलरी, लॅपटॉप, फोन, इलेक्ट्रिक इक्विपमेंट्सची खरेदी करू शकता. या सेलमध्ये खरेदीवर ग्राहकांना बंपर डिस्काउंट मिळणार आहे. सध्या जर तुम्ही स्मार्टफोन (Smartphone) खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी हा सेल उत्तम पर्याय आहे. कारण फ्लिपकार्ट सेलमध्ये Redmi 10 स्मार्टफोनवर प्रचंड डिस्काउंट मिळत आहे. डिस्काउंटमुळे या फोनची किंमत बरीच कमी होत आहे. त्यामुळे जर तुम्ही हा फोन घेण्यासाठी त्याच्या किमतीइतकं बजेट प्लॅन केलं असेल तर तुमचे बरेच पैसे वाचतील. त्यामुळे तुम्ही ही संधी सोडू नका. नवभारत टाइम्सने यासंदर्भात वृत्त दिलंय. Redmi 10 च्या 4GB+64GB व्हेरियंट फोनची किंमत 14,999 रुपये आहे. या फोनवर फ्लिपकार्टवर सध्या तब्बल 26% डिस्काउंट मिळत आहे. या डिस्काउंटनंतर तुम्ही फक्त 10,999 रुपयांमध्ये हा फोन खरेदी करू शकता. एवढंच नव्हे तर तुम्ही हा फोन आणखी स्वस्तात खरेदी करू शकता. तुम्ही म्हणाल या 26 टक्के डिस्काउंटशिवाय आणखी कोणती ऑफर आहे. तर या ऑफर अंतर्गत तुम्हाला या फोनसाठी फक्त 750 मोजावे लागतील. होय, फक्त 750 रुपयांमध्ये हा फोन तुमचा होऊ शकतो. सध्या या फोनवर एक्सचेंज ऑफर (Exchange Offer) देखील चालू आहे. एक्सचेंज ऑफर म्हणजे जुन्या फोनच्या बदल्यात नवा फोन मिळवणं. जर तुमच्या जुन्या फोनची कंडिशन चांगली असेल तर तुम्ही तो फ्लिपकार्टवर परत करून 10,250 रुपयांची सूट मिळवू शकता. पण त्याची एकमात्र अट अशी आहे की, तुमचा फोन चांगल्या कंडिशनमध्ये असायला हवा. ATM मधून पैसे काढण्यासह करा 'ही' कामं; एफडी ते बिल पेमेंटसह मिळतात अनेक सुविधा फ्लिपकार्टवर 4GB रॅम आणि 64GB स्टोरेज असलेल्या Redmi 10 च्या व्हेरियंटसाठी ही ऑफर आहे. तर 6GB रॅम आणि 128GB स्टोरेजच्या व्हेरियंटसाठी तुम्हाला 12,999 रुपये मोजावे लागतील. या व्हेरियंटची किंमत 16,999 रुपये आहे. तुम्हाला Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर 5% कॅशबॅकदेखील मिळेल. यासोबतच कंपनीकडून फोनची 1 वर्षाची वॉरंटीही दिली जात आहे. LPG Cylinder Price: एलपीजी सिलेंडर आजपासून स्वस्त; चेक करा किती रुपये कपात करण्यात आली? Redmi 10 ची फीचर्स Redmi 10 मध्ये 6.7 इंच HD+ डिस्प्ले आहे. तसंच यात ड्युअल कॅमेरादेखील आहे. त्याचा प्रायमरी कॅमेरा 50MP + 2MP आहे. तसंच फोनमध्ये तुम्हाला 6000 mAh ची बॅटरी पण मिळतेय. या फोनमध्ये तुम्हाला Qualcomm Snapdragon 680 प्रोसेसर मिळत आहे. यामुळे तुमच्या फोनचा स्पीडही चांगला असतो. रेडमी 10 हा रेडमीच्या सर्वाधिक विक्री होणाऱ्या स्मार्टफोनपैकी एक आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे या फोनमध्ये तुम्हाला कमी किंमतीत चांगले फीचर्स मिळतात. त्यामुळे तुम्हीही हा फोन घेण्याच्या विचारात असाल तर फ्लिपकार्टच्या बंपर सेलमधून खरेदी करा आणि डिस्काउंटची संधी सोडू नका.
    First published:

    Tags: Flipkart, Smartphone

    पुढील बातम्या