नवी दिल्ली, 27 ऑगस्ट : हल्लीच्या तरुणांमध्ये मोबाईल्सचा क्रेझ आहे. त्यात ऑनलाईन शॉपिंगची धूम असते त्यामुळे Fipkart वर मोबाईल्स बोनन्झा सेलचं आयोजन करण्यात आलं आहे. 26 ऑगस्टला या सेलची सुरूवात झाली आहे. तर 28 ऑगस्टपर्यंत सेल सुरू राहणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या वेळी अनेक स्मार्टफोनवर डिल आणि सूट देण्यात येत आहे.
या सेलमध्ये ग्राहक Apple iPhone SE (2020) (2020) आणि iPhone XR सवलतीच्या दरात खरेदी करू शकतात. तर Realme X50 Pro 5G, iQoo 3, Oppo Reno 2 आणि Oppo Reno 10x Zoom सारख्या स्मार्टफोनवर प्रीपेड आणि एक्सचेंज सवलतही दिली जात आहे.
सगळ्यात खास म्हणजे, ई-कॉमर्स पोर्टलद्वारे निवडलेल्या स्मार्टफोनवर एक हजार रुपयांची अतिरिक्त एक्सचेंज सवलतही दिली जात आहे. यामुळे ग्राहकांनी फ्लिपकार्टवर खरेदीची घाई सुरू केली आहे. विक्रीदरम्यान नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना विना-किंमत ईएमआय पर्यायदेखील दिला जात आहे.
आज स्वस्तात लॉन्च होणार Xiaomi चा Redmi 9, वाचा काय आहे जबरदस्त वैशिष्ट्ये
फ्लिपकार्टने तयार केलेल्या मायक्रोसाईटनुसार, ग्राहक iPhone SE (2020) च्या 64GB स्टोरेजचे बेस व्हेरिएंट 42,500 रुपयांऐवजी 35,999 रुपयात खरेदी करू शकतात. त्याचप्रमाणे 128 जीबीचे 47,800 रुपयांऐवजी 40,999 रुपयांमध्ये खरेदी करता येईल. विना-किंमत ईएमआय पर्याय आणि एक्सचेंज सूट देखील यावर मिळणार आहे.
...तर राज्यात शाळा सुरू होतील, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली माहिती
तसंच सेलमध्ये iPhone XR वर 6,501 रुपयांची सूट देण्यात येत आहे. ग्राहक फोनचे 64 जीबी 52,500 रुपयांऐवजी 45,999 रुपये आणि 128 जीबी 57,800 रुपयांऐवजी 51,999 रुपयांत खरेदी करू शकतात.
आता महाराष्ट्रात घेऊ शकता स्वस्तात घरं, ठाकरे सरकारने घेतला मोठा निर्णय
दरम्यान, फ्लिपकार्ट सेलमध्ये एक्स्चेंज सवलतीवर Redmi K20 हा फोन 19,999 रुपयांना विकला जात आहे. तर ग्राहक Oppo Reno 2F हा 18,990 रुपयांऐवजी 17,990 रुपये आणि Oppo A5s हा फोन 8,990 रुपयांऐवजी 7,990 रुपयात खरेदी करू शकतात. तर ई-कॉमर्स पोर्टलद्वारे Realme X50 Pro 5G, iQoo 3, Oppo A12 आणि Vivo Y50 या स्मार्टफोनवर एक्सचेंज सवलत देण्यात आली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.