नवी दिल्ली, 26 ऑक्टोबर : फ्लिपकार्टवर (Flipkart)दसरा स्पेशल (Dussehra Specials) सेल सुरू आहे. हा सेल 22 ऑक्टोबरपासून सुरू झाला असून सेलचा शेवटचा दिवस 28 ऑक्टोबर आहे. सेलमध्ये अनेक धमाकेदार ऑफर्स देण्यात आल्या आहेत. या ऑफर्सअंतर्गत काही डिल्स अशा आहेत, ज्यात काही स्मार्टफोन अतिशय कमी दरात, स्वस्तात खरेदी करता येणार आहेत. याच सेलमध्ये सॅमसंगच्या नुकत्याच लाँच झालेल्या गॅलेक्सी F41 वर (Samsung Galaxy F41) जबरदस्त ऑफर देण्यात आली आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत 16,999 रुपये आहे.
फ्लिपकार्टवर दिलेल्या माहितीनुसार, Samsung Galaxy F41 वर Flipkart Smart Upgrade ऑफर आहे. ज्याअंतर्गत फोन केवळ 11,910 रुपयात खरेदी करता येणार आहे.
या फोनची खरेदी करताना पेमेंट Kotak डेबिट/क्रेडिट कार्डमधून केल्यास, 10 टक्के सूट दिली जात आहे. त्याशिवाय बँक ऑफर्स अंतर्गत HSBC क्रेडिट कार्डद्वारेही 10 टक्के डिस्काउंट दिला जात आहे. तसचं, स्पेशल प्राईजअंतर्गत फोनवर 3000 रुपयांची सूट दिली जात आहे.
Samsung Galaxy F41 या फोनच्या बेस मॉडेल 6GB+64GB ची किंमत 16,999 रुपये आहे. तर 6GB+128GB वेरिएंटची किंमत 17,999 रुपये आहे. फोनला 6.4 इंची sAMOLED Infinity-U डिस्प्ले, Exynos 9611 प्रोसेसर, अँड्रॉईड 10 बेस्ड OneUI, 6000mAh बॅटरी 15W फास्ट चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.
Thanks for all the love, fam! You guys showed us some #FullOn love. Own the #GalaxyF41 at just ₹10860 with Flipkart Smart Upgrade Plan. *T&C apply. Buy now on @Flipkart: https://t.co/GD7gxqlW91#Samsung pic.twitter.com/HB2MDNGd18
— Samsung India (@SamsungIndia) October 25, 2020
Samsung Galaxy F41 ला रियर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. फोनमध्ये 64 मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सल अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सल डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. त्याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सल सेल्फी कॅमेरा आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Samsung galaxy, Smartphone