Home /News /technology /

Flipkart Big Saving Days Sale; 80 टक्के डिस्काउंटमध्ये मिळेल इलेक्ट्रॉनिक सामान

Flipkart Big Saving Days Sale; 80 टक्के डिस्काउंटमध्ये मिळेल इलेक्ट्रॉनिक सामान

Flipkart Big Saving Days Sale 17 जानेवारीपासून सुरू होणार असून 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. हा सेल उद्या 16 जानेवारीपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी सुरू होणार आहेत.

  नवी दिल्ली, 15 जानेवारी : फ्लिपकार्टने (Flipkart) आपला बिग सेविंग डेज सेल 2022 (Big Saving Days Sale) आयोजित केला आहे. या सेलमध्ये मोबाइल, इलेक्ट्रॉनिक, फर्निचर, कपड्यांवर डिल्स आणि डिस्काउंट ऑफर मिळणार आहे. Flipkart Big Saving Days Sale 17 जानेवारीपासून सुरू होणार असून 22 जानेवारीपर्यंत असणार आहे. हा सेल उद्या 16 जानेवारीपासून फ्लिपकार्ट प्लस मेंबर्ससाठी सुरू होणार आहेत.

  हे वाचा - Alert! ...तर कोरोना लशीचा बुस्टर डोस रिकामं करेल तुमचं बँक अकाऊंट

  प्रजासत्ताकदिनाआधी Amazon चा ग्रेट रिपब्लिक डे सेलदेखील सुरू होणार आहे. दोन्ही प्लॅटफॉर्मवर सेल एकत्रच लाइव्ह होणार आहे. अशात तुम्ही काही खरेदी करण्याची तयारी करत असाल, तर Amazon वर Republic Day आधी मोठा डिस्काउंट मिळणार आहे. Great Republic Day Sale भारतात 17 जानेवारीपासून सुरू होईल आणि 16 जानेवारी रोजी प्राइम मेंबर्स यासाठी अॅक्सेस करू शकतील.

  हे वाचा - Car प्रवास होणार सुरक्षित, Road Safety बाबत सरकारची मोठी घोषणा

  मिळेल बंपर सूट - Amazon स्मार्टफोनमध्ये अनेक ऑफर्स दिल्या जाणार आहेत. SBI कार्डने पेमेंट केल्यानंतर डिस्काउंटही मिळेल. SBI च्या क्रेडिट कार्ड ग्राहकांसाठी 10 टक्क्यांचा अॅडिशनल फायदा मिळू शकतो. तर Flipkart वर बिग सेविंग डेज सेलमध्ये ICICI बँक क्रेडिट आणि डेबिट कार्डवर 10 टक्के सूट मिळेल.

  हे वाचा - कोणत्या बँक खात्याशी लिंक आहे तुमचं Aadhaar Card, घरबसल्या असं तपासा

  आतापर्यंत दोन्ही ई-कॉमर्स कंपन्यांनी स्मार्टफोनवर स्पेशल ऑफरची घोषणा केलेली नाही. परंतु Poco, Apple, Realme आणि Samsung स्मार्टफोन, स्मार्टवॉच, ईयरबड्स, लॅपटॉपशिवाय इतर इलेक्ट्रॉनिक डिवाइसवर 80 टक्के सूट मिळेल.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Amazon, Flipkart, Online shopping, Tech news

  पुढील बातम्या