नवी दिल्ली, 5 मे : फ्लिपकार्टवर बिग सेव्हिंग डेज (Flipkart Big Saving Days) सुरू असून 7 मे रोजी हा सेल संपणार आहे. या सेलमध्ये स्मार्टफोनवर चांगली ऑफर देण्यात येत आहे. सेलमध्ये रियलमी, सॅमसंग, मोटोरोला यांसारख्या पॉप्यूलर फोनवर एक्सचेंज ऑफर, कार्ड ऑफर, EMI आणि स्पेशल प्राईझच्या माध्यमातून मोठी सूट देण्यात येत आहे. सेलमध्ये सॅमसंगचा 6000mAh बॅटरीवाला फोन अगदी कमी किमतीत तुम्ही खरेदी करू शकता.
ही बेस्ट डील आहे सॅमसंग गॅलेक्सी (Samsung galaxy) F41या फोनवर. हा फोन दोन व्हेरीयंटमध्ये येतोय. पहिला व्हेरियंट 6 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेजचा आहे. याची किंमत 19,999 रुपये आहे. हा फोन 7,000 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटसह केवळ 12,999 रुपयांत तुम्ही विकत घेऊ शकता. याशिवाय एक्सचेंज ऑफरच्या माध्यमातून फोनवर 12,250 रुपयांची सूट दिली जात आहे. जर ग्राहक त्याचा जुना फोन एक्सचेंज करत असेल आणि त्याच्या फोनने एक्सचेंज वॅल्यू पूर्ण केली, तर ग्राहकांना हा फोन केवळ 749 रुपयांत मिळू शकतो.
फोनचं दुसरं व्हेरियंट 6 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज असलेल्या या फोनची किंमत 20,999 रुपये आहे. 6,500 रुपयांच्या फ्लॅट डिस्काउंटनंतर हा फोन तुम्ही 14,499 रुपयांत खरेदी करू शकता. याशिवाय या फोनवर 13,700 रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफर देण्यात येत आहे. म्हणजेच जर ग्राहक त्यांचा जुना फोन एक्सचेंज करत असेल आणि त्या फोनने एक्सचेंज वॅल्यू (exchange value) पूर्ण केली तर, हा फोन ग्राहकांना 799 रुपयांत मिळू शकतो.
सॅमसंगच्या या फोनला 6.4 इंचचा sAMOLED Infinity-U डिस्प्ले आहे. तसंच त्याचं रिझॉल्यूशन (Resolution) 1080x2400 पिक्सल्स आणि अस्पेक्ट रेश्यो 20:9आहे. हा फोन कंपनीच्या Exynos 9611 प्रोसेसरसह आणि अँड्रॉयड 10 बेस्ड सॅमसंगच्या OneUI स्किनसोबत येतो.
फोनमध्ये ट्रिपल कॅमेरा आणि 6000mAh बॅटरी -
गॅलेक्सी F41च्या रिअर पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअपआहे. फोनमध्ये 64मेगापिक्सल प्रायमरी सेंसर, 8 मेगापिक्सलची अल्ट्रा-वाइड लेन्स आणि 5 मेगापिक्सलचा डेप्थ सेंसर देण्यात आला आहे. याशिवाय सेल्फी आणि व्हिडियो कॉलिंगसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. सोबतच Galaxy F41 मध्ये 6000mAh ची मोठी बॅटरी असून ती 15W फास्ट चार्जिंगसह येते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.