OFFER! 10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे आणि HD+ डिस्प्ले

OFFER! 10 हजारापेक्षाही कमी किंमतीत आहे हा धमाकेदार फोन, मिळणार 4 कॅमेरे आणि HD+ डिस्प्ले

सगळ्यात विशेष म्हणजे 4 जीबी रॅम + 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह हा फोन बाजारात विक्रीसाठी आणला गेला आहे.

  • Share this:

मुंबई, 07 सप्टेंबर : बजेट फोन इन्फिनिक्स हॉट 9 (Infinix Hot 9) हा आज फ्लॅश सेलमध्ये खरेदी करता येणार आहे. त्यामुळे गॅजेट प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. कंपनीने या फोनची किंमत फक्त 9,499 रुपये केल्यामुळे मोठ्या प्रमाणात या फोनची खरेदी सुरू आहे. सगळ्यात विशेष म्हणजे 4 जीबी रॅम 64 जीबी स्टोरेज व्हेरिएंटसह हा फोन बाजारात विक्रीसाठी आणला गेला आहे. दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर (Flipkart) या फोनची विक्री सुरू झाली आहे.

कमी किंमतीसह या फोनच्या खरेदीसाठी अनेक प्रकारच्या ऑफरही देण्यात आल्या आहेत. या फोनच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर इन्फिनिक्सने यामध्ये क्वाड कॅमेरा आणि एक दमदार बॅटरी दिली आहे. त्यामुळे हा फोन तरुणांसाठी विशेष आकर्षनाचा ठरत आहे.

Vodafone-Idea कंपनीला मिळाली नवी ओळख, आतापासून असणार नवीन नाव

या फोनला खरेदी करण्यासाठी फ्लिपकार्टने फोनला Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डच्या माध्यमातून जोडलं आहे. तिथे फोन खरेदीवर 5% अनलिमिटेड कॅशबॅक देण्यात आला आहे. इतकंच नाही तर अ‍ॅक्सिस बँक बझ क्रेडिट कार्डद्वारे फोनच्या पेमेंटवर 5% सूट देण्यात आली आहे.

काय आहे फोनची खास वैशिष्ट्ये?

Infinix Hot 9 या फोनला कंपनीने खास पंच होल डिस्प्ले दिला आहे. इन्फिनिक्स हॉट 9 प्रो मध्ये 6.6 इंचाचा फुल एचडी प्लस पंच होल डिस्प्ले आहे. ज्याचा 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन आहे. कंपनीचा हा सगळ्यात स्वस्त फोन मीडियाटेक Helio P22 ऑक्टा-कोर प्रोसेसरवर काम करतो. हा स्मार्टफोन Android 10 वर असून XOS 6.0 ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. फोनच्या मागच्या बाजूला LED फ्लॅश सुद्धा देण्यात आला आहे. या फोनच्या कॅमेर्‍यामध्ये गुगल लेन्ससारखी खास वैशिष्ट्य देण्यात आली आहे.

अंत्यसंस्कार करताना मृतदेहाचा चेहरा उघडताच बसला धक्का, पालिकेचा ढिम्म कारभार उघड

या फोनची सगळ्यात खास गोष्ट म्हणजे कमी किंमतीत असलेला क्वाड रियर कॅमेरा. याचा पहिला कॅमेरा 13 मेगापिक्सलचा आहे, जो f/1.8 अपर्चरसह आहे. याव्यतिरिक्त 2 मेगापिक्सलचा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आणि लो लाइट सेन्सर आहे. फोनमध्ये सेल्फीसाठी 8 मेगापिक्सलचा कॅमेरा आहे. पॉवरसाठी इन्फिनिक्स हॉट 9 प्रो मध्ये 5,000 एमएएच बॅटरी आहे, जी 10 डब्ल्यू चार्जरसह आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 7, 2020, 3:07 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading