मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? चेक करा 10 लाखपेक्षा कमी किमतीत बेस्ट कार

नवीन कार खरेदी करायचा विचार करताय? चेक करा 10 लाखपेक्षा कमी किमतीत बेस्ट कार

नवरात्रीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, व तुमचं बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेली कारखरेदी करू शकता.

नवरात्रीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, व तुमचं बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेली कारखरेदी करू शकता.

नवरात्रीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, व तुमचं बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेली कारखरेदी करू शकता.

मुंबई, 19 सप्टेंबर : नवरात्र (Navratri) आणि दसऱ्याच्या (Dussehra) शुभमुहूर्तावर गाड्यांची खरेदी मोठ्या प्रमाणात केली जाते. त्यातही कमी किंमत (Low Price) आणि जास्त मायलेज (High Mileage) तसंच कमी मेंटेनन्स असलेली कार (Car) खरेदी करण्यास अनेकांची पसंती असते. तुम्हीही कमी किंमतीत कार खरेदी करण्याचं प्लॅनिंग करत असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. कारण आज आम्ही तुम्हाला 10 लाख रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणाऱ्या 5 बेस्ट कारसंबंधी माहिती देत आहोत. ‘झी बिझनेस हिंदी’ ने याबाबत वृत्त दिलंय. टाटा पंच (Tata Punch) टाटाच्या या दमदार एसयुव्हीची (SUV) सुरुवात 5.93 लाख रुपयांपासून सुरू होते. यामधील टॉप मॉडेलची किंमत 9.49 लाख रुपये आहे. या कारमध्ये 1199 सीसीचं पॉवरफुल इंजिन आहे. कंपनीने या मॉडेलचे 22 व्हेरियंट दिले आहेत. यात पंच प्युअर (Punch Pure) हे बेस मॉडेल आहे, आणि ‘द काझीरंगा एडिशन’ (The Kaziranga edition) हे टॉप मॉडेल आहे. कारचे मायलेज 18.97 किमी आहे. PF Amount: कंपनीने PFची रक्कम कापली मात्र खात्यात जमा केली नाही, तर कर्मचारी काय करु शकतात? टाटा नेक्सॉन (Tata Nexon) टाटाची ही कार पेट्रोल आणि डिझेल अशा दोन्ही व्हर्जनमध्ये येते. पेट्रोल इंजिन 1199 सीसी आणि डिझेल इंजिन 1497 सीसी आहे. नेक्सॉनच्या बेस मॉडेलची सुरुवातीची किंमत 7.59 लाख रुपये आहे. नेक्सॉन 67 व्हेरियंट आणि 8 रंगांमध्ये येते. रेनॉ कायगर (Renault Kiger) 5 सीट असणाऱ्या या एसयुव्हीची किंमत 5.84 लाख ते 10.62 लाख रुपये आहे. या कारचे 999 सीसीचं पेट्रोल इंजिन आहे. मायलेज 18.24 किमी ते 20.5 किमी आहे. रेनॉ कायगर 20 व्हेरियंटमध्ये उपलब्ध असून, त्यात बेस मॉडेल RXE आणि टॉप मॉडेल RXZ Turbo CVT DT यांचाही समावेश आहे. रेनॉ ट्रायबर (Renault Triber) रेनॉच्या या एमयुव्ही (MUV) ची किंमत 4.95 लाख रुपयांपासून सुरू होते. कारमध्ये 7 सीट आहेत. इंजिन क्षमता 999 सीसी आहे. ही कार 20 किमीपर्यंत मायलेज देऊ शकते. रेनॉ ट्रायबर 10 व्हेरियंटमध्ये व 10 रंगांमध्ये उपलब्ध आहे. Triber RXZ EASY-R AMT Dual Tone हे टॉप मॉडेल असून त्याची किंमत 8.51 लाख रुपये आहे. Demat Account: 30 सप्टेंबरपर्यंत हे महत्वाचं काम पूर्ण करा, अन्यथा तुमचे डिमॅट खाते बंद होईल मारुती ब्रेझा (Maruti Brezza) मारुतीच्या या मॉडेलची सुरुवात 7.99 लाख रुपयांपासून होते, आणि टॉप मॉडेलची किंमत 13.96 लाख रुपये आहे. 5 सीट असणाऱ्या या एसयुव्हीचे 11 व्हेरियंट आहेत, ज्यामध्ये Brezza Lxi हे बेस मॉडेल आणि Brezza Zxi Plus AT DT हे टॉप मॉडेल आहे. या कारमध्ये 1462 सीसीचं इंजिन असून, ही कार 20.15 किमीपर्यंत मायलेज देते. नवरात्रीमध्ये नवीन कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल, व तुमचं बजेट 10 लाख रुपयांपर्यंत असेल, तर तुम्ही तुमच्या बजेटमध्ये जास्त मायलेज आणि कमी मेंटेनन्स असलेली कारखरेदी करू शकता.
First published:

Tags: Car, Tech news

पुढील बातम्या