• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • नदीत मच्छीमाराला सापडला iPhone, फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर झाला मोठा खुलासा

नदीत मच्छीमाराला सापडला iPhone, फेसबुकवर पोस्ट केल्यानंतर झाला मोठा खुलासा

मासेमारीसाठी फिशिंग रॉड पाण्यात टाकल्यानंतर अचानक काहीतरी विचित्र गोष्ट त्यांना जाणवली आणि त्यांनी तो रॉड पुन्हा बाहेर काढला. पाण्यात त्यांना दुसरं-तिसरं काही नाही, तर चक्क आयफोन सापडला.

 • Share this:
  नवी दिल्ली, 23 जुलै: मोबाईल कंपन्यांमध्ये अ‍ॅपल ब्रँडच्या आयफोनची (Apple iPhone) नेहमीच चर्चा असते. दरवर्षी कंपनी जबरदस्त फीचर्ससह नव्या सीरिज लाँच करत असते. आयफोनची किंमत तुलनेने जास्त असली तरीही त्याची युजर्समध्ये मोठी क्रेझ आहे. आयफोन डॅमेज होण्याचीही शक्यता तुलनेने कमी असल्याने त्यांच्या क्वालिटीचीही मोठी चर्चा असते. असाच एक प्रकार नुकताच समोर आला आहे. एका मच्छीमाराला पाण्यात आयफोन सापडला आणि त्याची आश्चर्यकारकपणे ओळखही पटली. मच्छीमार जेसन रॉबिन्सन वेकामाव नदीत मच्छीमारीसाठी गेले होते. मासेमारीसाठी त्यांनी फिशिंग रॉड पाण्यात टाकल्यानंतर अचानक काहीतरी विचित्र गोष्ट त्यांना जाणवली आणि त्यांनी तो रॉड पुन्हा बाहेर काढला. पाण्यात त्यांना दुसरं-तिसरं काही नाही, तर चक्क आयफोन सापडला. त्यांनी आपल्या पत्नीला त्यांना नदीत आयफोन मिळाल्याचं दाखवण्यासाठी त्या पाण्यातील फोनचा फोटो काढला. रॉबिन्सनने हा फोन आपल्या बोटीवर ठेवला आणि पुन्हा मासेमारीसाठी गेले. काही वेळाने फोनला लागलेला चिखल साफ करताना त्यांना फोनमध्ये एक फोटो सापडला, ज्यात एका तरुणीने तरुणाला उचलून घेतल्याचं दिसत होतं. त्यांनी या फोटोद्वारे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे या कपलला शोधण्याचं ठरवलं आणि फेसबुकवर फोटो पोस्ट केला. महत्त्वाची बाब म्हणजे, फेसबुकवर फोटो पोस्ट केल्यानंतर पाच मिनिटातच फोटोमधील तरुणीची ओळख समोर आली. रिले जॉनसन या तरुणीने हा आपला हरवलेला फोन असल्याचं सांगत, फोन पाहून अतिशय आनंद झाल्याचंही तिने म्हटलं. साउथ कॅरोलिना येथे हा प्रकार घडला. रिले जॉनसन 8 महिन्यांपूर्वी मित्र-परिवारासोबत याठिकाणी फिरायला आली असताना तिचा हा आयफोन हरवला होता. तिचे पती घरापासून नेहमी दूर असल्याने ती नेहमी त्यांचा फोटो आपल्या जवळ ठेवत होती. 2018 मध्ये एका पार्कमध्ये फोटोशूट करताना त्यांनी हा फोटो काढल्याची आठवणही त्या तरुणीने सांगितली. मच्छीमार रॉबिन्सनने त्या तरुणीला भेटून त्यांचा फोटो आणि आयफोन परत केला. आश्चर्यच आहे! वर्षभर पाण्यात राहूनही चालू स्थितीत राहिला iPhone 11 Pro Max दरम्यान, मागील काही महिन्यांपूर्वी एका व्यक्तीचा पाण्यात पडलेला आयफोन तब्बल 6 महिन्यानंतरही चालू स्थितीत असल्याचं समोर आलं होतं. आयफोन पाण्यात पडल्यानंतर, उंचावरुनही पडल्यानंतर चालू स्थितीत राहिल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत.
  Published by:Karishma
  First published: