Elec-widget

बरोबर 24 वर्षांपूर्वी देशात झाला पहिला मोबाइल कॉल, काय बोलणं झालं या कॉलमध्ये?

बरोबर 24 वर्षांपूर्वी देशात झाला पहिला मोबाइल कॉल, काय बोलणं झालं या कॉलमध्ये?

आजच्या काळात मोबाइलशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जगभरातल्या मोबाइल फोन मार्केटमध्ये भारत आघाडीवर आहे.या क्रांतीची सुरुवात झाली बरोबर 24 वर्षांपूर्वी.देशातला पहिला मोबाइल कॉल 31 जुलैलाच केला गेला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 जुलै : आजच्या काळात मोबाइलशिवाय जगण्याची आपण कल्पनाही करू शकत नाही. जगभरातल्या मोबाइल फोन मार्केटमध्ये भारत आघाडीवर आहे.या क्रांतीची सुरुवात झाली बरोबर 24 वर्षांपूर्वी.देशातला पहिला मोबाइल कॉल 31 जुलैलाच केला गेला होता.

आता मोबाइल कॉल करताना आपलं लक्ष बिलाकडे नसतं. मोबाइल कॉल करणं, इंटरनेट डेटा वापरणं खूपच स्वस्त झालं आहे पण भारतात जेव्हा मोबाइल कॉल सुरू झाला तेव्हा एक कॉल करतानाही अनेकदा विचार करावा लागायचा.

31 जुलै 1995 ला देशातला पहिला मोबाइल कॉल लावला गेला. केंद्र सरकारचे तत्कालीन मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योति बसु यांच्यामध्ये या पहिल्या मोबाइल कॉलवर बातचीत झाली.

हिंदू बिझनेस ने दिलेल्या बातमीनुसार, सुखराम ज्योति बसुंना म्हणाले, वायरलेस तंत्रावर आधारित असलेल्या या प्रणालीमुळे देशात मोठी क्रांती होणार आहे.त्यावेळेस मोबाइल कॉलसाठी मिनिटाला 16 रुपये मोजावे लागायचे.

जेव्हा पाण्यात चक्क पाच मजली इमारत वाहते, पाहा VIDEO

Loading...

1994 मध्ये ज्योति बसु यांनी उद्योगपती भूपेंद्रकुमार मोदी यांच्याशी झालेल्या भेटीत एक इच्छा व्यक्त केली. त्यांना सगळ्यात पहिल्यांदा कोलकात्यामध्ये मोबाइल नेटवर्क सुरू करायचं होतं!

यानंतर नऊ महिन्यांनी भारतातल्या सेल्युलर सेवेचं स्वप्न प्रत्यक्षात उतरलं. यानंतर भारतात झालेल्या मोबाइल क्रांतीचे आपण सगळेच साक्षीदार आहोत.

भूपेंद्रकुमार मोदी हे भारतातल्या प्रमुख उद्योगपतींपैकी एक होते. 90 च्या दशकात ते टेलिकॉम क्षेत्राशी जोडले गेले आणि भारताच्या मोबाइल क्रांतीचे सूत्रधार बनले.

ज्या सेल्युलर नेटवर्कच्या माध्यमातून पहिला मोबाइल कॉल लावला गेला त्या कंपनीचा मी प्रमुख होतो हे माझं भाग्य आहे, मी जेव्हा याबदद्ल विचार करतो तेव्हा अजूनही मला ही गोष्ट कल्पनेच्या पलीकडची वाटते, असे उद्गगार त्यांनी काढले होते.

==========================================================================================

सोलापूरमध्ये बँकेचा स्लॅब कोसळला, दुर्घटनेचा पहिला VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 31, 2019 04:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...