नील आर्मस्ट्राँग यांना चंद्रावर पहिलं पाऊल टाकणं सोपं नव्हतं; अंतराळवीरांना कसं दिलं जातं प्रशिक्षण

नील आर्मस्ट्राँग यांना चंद्रावर पहिलं पाऊल टाकणं सोपं नव्हतं; अंतराळवीरांना कसं दिलं जातं प्रशिक्षण

मानवाने चंद्रावर माणूस पाठवल्याच्या मोहिमेला आता बरीच वर्षं झाली. एवढा कालावधीमध्ये का गेला असेल, याचा कधी विचार केलाय?

  • Share this:

अमेरिका, 05 मार्च: मानवाने चंद्रावर माणूस पाठवल्याच्या मोहिमेला आता बरीच वर्षं झाली. एवढा कालावधी मध्ये का गेला असेल, याचा कधी विचार केलाय? तसा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर चंद्राच्या पृष्ठभागावर लँडिंग करून तिथे पहिलं पाऊल टाकण्यातल्या अडचणींच्या प्रक्रियेत आहे. अलीकडेच एका यू-ट्यूब चॅनेलवर हा विषय मांडण्यात आला. चंद्रावर पहिलं पाऊल टाकण्याचा मान मिळालेले नील आर्मस्ट्राँग (Neil Armstrong) यांनीच या प्रश्नाचं उत्तर सांगितलं आहे.

अमेरिकन इंजिनीअर डेस्टिन सँडलीन'स्मार्टर एव्हरीडे' (Smarter Every Day) या नावाचं यू-ट्यूब चॅनेल चालवतो. अलीकडेच प्रसारित केलेल्या एका व्हिडिओमध्ये त्याने'नासा'ने (NASA)चंद्रावर उतरण्यासाठी आपल्या अंतराळवीरांना कसं प्रशिक्षण दिलं याबद्दल भाष्य केलं आहे. अपोलो (Apollo)मोहिमांतर्गत 1969 ते 1972 या कालावधीत 17 मोहिमांमध्ये 12 अंतराळवीर चंद्राच्या पृष्ठभागावर उतरले. 22 मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये चंद्रावर पहिलं पाऊल ठेवणारे नील आर्मस्ट्राँग यांचं भाषणही आहे. 2007 मध्ये त्यांनी 'सोसायटी ऑफ एक्स्परीमेंटल टेस्टपायलट्स'च्या समोर हे भाषण केलं होतं.

1962मध्ये फ्लाइट रिसर्च सेंटरने लुनार लँडिंग सिम्युलेटर प्रोग्रामचा (Lunar Landing Simulator Programme) प्रस्ताव कसा मांडला होता, याबद्दल त्या भाषणात आर्मस्ट्राँगयांनी माहिती दिली. (हे रिसर्च सेंटर आता आर्मस्ट्राँग फ्लाइट रिसर्च सेंटरम्हणून ओळखलं जातं.) सिम्युलेटर प्रोग्रामचे तीन भाग होते. प्राथमिक अभ्यास, रिसर्च टेस्ट व्हेइकल आणि अपोलो फ्लाइट सिम्युलेटर. रिसर्च टेस्टव्हेइकल अगदी लहान आणि फारसा खर्च न करता तयार करण्यात आलेलं होतं. 2000फूट उंचीवरून चंद्रावर लँडिंग होताना काय समस्या येऊ शकतात,हेतपासण्यासाठी सिम्युलेटरची निर्मिती करण्यात आली होती. त्यातील कंट्रोलकॅरॅक्टरिस्टिक्स,कॉकपिट कॉन्फिगरेशन्स डिस्प्लेज आदींमध्ये बदल करण्याचीक्षमताही त्यात होती,असं आर्मस्ट्राँग यांनी सांगितलं.

चंद्रावरचं गुरुत्वाकर्षण पृथ्वीच्या तुलनेत खूपच कमी आहे. त्यामुळे सिम्युलेशन्सचीआवश्यकता होती. पृथ्वीवर उडणाऱ्या घटकांचं जमिनीवर लँडिंग ज्या पद्धतीने होतं, त्यापेक्षा वेगळ्या पद्धतीच्या लँडिंगच्या तंत्रांची प्रॅक्टिसअंतराळवीरांना करावी लागली. पृथ्वीवर हेलिकॉप्टर ज्याप्रमाणे घिरट्या घालतमग जमिनीवर उतरतं,त्याप्रमाणे चंद्रावरचं लँडिंग असू शकेल,असा विचारनासाचे शास्त्रज्ञ करत होते.

मात्र हेलिकॉप्टरएवढ्याच वजनाच्या स्पेस क्राफ्टला (अंतराळयान) क्षितिज समांतर वेग मिळण्यासाठी या पद्धतीत खूपच तिरकं व्हावं लागत होतं, ही समस्या होती. चंद्रावर पृथ्वीप्रमाणे वातावरण नसतं आणि पृथ्वीवरच्या घटकाचं तिथलं वजन एक षष्ठांश एवढंच भरतं. त्यामुळे तितकाच क्षितिज समांतर वेग मिळण्यासाठी यान तिरकं होण्याचा कोन सहा पट अधिक असावा लागणार होता, असं आर्मस्ट्राँग यांनी सांगितलं.

अमेरिकेने 50आणि 60च्या दशकातच व्हर्टिकली म्हणजे उभ्या पद्धतीने लँडिंग आणि उड्डाणकरू शकणारी विमानं विकसित केली होती. त्याबद्दल व्हिडिओत माहिती देण्यात आली आहे. त्याX-14चा वापर सिम्युलेटर म्हणून करता येऊ शकेल, असं शास्त्रज्ञांना वाट होतं. मात्र तरीही चंद्रावरच्या कमी गुरुत्वाकर्षणाच्यास्थितीचे परिणाम त्यातून दिसू शकले नाहीत, असं आर्मस्ट्राँग यांनी सांगितलं.

(हे पाहा:डिजीटल युगातील लहानग्यांचा जगाकडे पाहाण्याचा दृष्टीकोन कसा? संशोधनातून आलं समोर   )

दोन वेळा तयार करण्यात आलेली व्हेइकल्स बाद गेली. त्यानंतर नासाच्या लुनार लँडिंग रिसर्च फॅसिलिटीने अपोलो यानाच्या लँडिंगचं सिम्युलेशन करण्यासाठी चंद्रावर वजन एक षष्ठांश होत असल्याच्या तत्त्वाचाविचार केला. त्या व्हेइकलचं वजन त्याच्या चंद्रावरच्या वजनाएवढं ठेवण्यातआलं. त्यासाठी त्याला एका फिरणाऱ्या ब्रिज क्रेनला जोडलेल्या उभ्या केबलनेवर धरण्यात आलं.

अर्थात,एवढं सगळं करूनही पायलटना प्रत्यक्षउडण्याचा अनुभव घेता आला नाही. कारण ते यान केबलला बांधलेलं होतं. त्यानंतरलुनार लँडिंग ट्रेनिंग व्हेइकलचं वजन एक षष्ठांश वजनाच्या तत्त्वानेरूपांतरित करण्यात आलं. अखेर शेवटी या पद्धतीने अंतराळवीरांना चंद्रावरउतरण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं.

First published: March 5, 2021, 7:50 AM IST
Tags: nasa

ताज्या बातम्या