मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

ऑनलाईन खरेदी करताय? या 5 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा आर्थिक फसवणुकीचा धोका

ऑनलाईन खरेदी करताय? या 5 गोष्टी लक्षात ठेवाच, अन्यथा आर्थिक फसवणुकीचा धोका

कार किंवा कोणत्याही वस्तूच्या ऑनलाईन खरेदीवेळी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कार किंवा कोणत्याही वस्तूच्या ऑनलाईन खरेदीवेळी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

कार किंवा कोणत्याही वस्तूच्या ऑनलाईन खरेदीवेळी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

  • Published by:  Karishma

नवी दिल्ली, 28 ऑगस्ट : भारतीय ऑटोमोबाईल इंडस्ट्रीमध्ये डिजीटल विक्रीने मोठं यश मिळवलं आहे. कोरोना काळात लोकांकडे गाडी खरेदी करण्यासाठी डिजीटल हा एकमेव पर्याय होता. आता हाच पर्याय अनेक ग्राहक वापरताना दिसतात. परंतु ऑनलाईन ट्रान्झेक्शन पेमेंट्सवेळी आर्थिक सुरक्षा अतिशय महत्त्वाची आहे. अनेकांची ऑनलाईन व्यवहाराद्वारे फसवणूक झाल्याची प्रकरणं समोर आली आहेत. फसवणूक ऑटोमोटिव्ह रिलेटिव्ह एन्क्वायरीवेळी किंवा ऑनलाईन खरेदीवेळी झाली आहे. त्यामुळे कार किंवा कोणत्याही वस्तूच्या ऑनलाईन खरेदीवेळी काही गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे.

स्किम आणि डिस्काउंट्स -

अनेकदा एखादी स्किम पाहून ग्राहक त्या वस्तूकडे आकर्षित होतात. परंतु सर्वच स्किम खऱ्या नसतात. त्यामुळे कोणत्याही ऑफरचा फायदा घेण्याआधी त्याच्या खऱ्या डिल्स आणि ऑफर्सबाबत योग्य माहिती करुन घेणं गरजेचं आहे. अधिकृत साईटवर शहानिशा करणं गरजेचं आहे.

वेब पोर्टल -

कोणतीही गाडी खरेदी करताना, सर्वात आधी वेबसाईटचा यूआरएल चेक करा. ऑफर्स दिल्या गेल्या नसल्या, तरी फेक URL द्वारे फसवणूक केली जाऊ शकते. सोशल मीडियावर कंपनीचं अकाउंट तपासू शकता.

WhatsApp वर अश्लील व्हिडीओच्या जाळ्यात अडकल्यास बसेल मोठा आर्थिक फटका, अशी होतेय फसवणूक

स्पॅम मेल्स -

प्रमोशनल ईमेल्सवर अधिक क्लिक करू नका. अनेकदा एखाद्या लिंकवर क्लिक केल्यानंतर फिशिंग अटॅकमध्ये अडकण्याची शक्यता असते.

पेमेंट पोर्टल -

ऑनलाईन पेमेंट करणं आता सर्वांच्याच आयुष्याचा भाग झाला आहे. परंतु वाढत्या फ्रॉडच्या प्रकरणात कार्डची माहिती टाकण्याआधी प्रत्येक गोष्ट तपासणं आवश्यक आहे. काही चुकीचं आढळल्यास, कस्टमर केअरवर कॉल करा. त्याशिवाय सोशल मीडिया हँडल किंवा जवळच्या डिलरशीपकडे जाऊ शकता.

First published:

Tags: Online shopping, Tech news