• Home
  • »
  • News
  • »
  • technology
  • »
  • लोकर आणि कोंबडीच्या पंखांपासून बनणार पशूखाद्य, वैज्ञानिकांना मोठं यश

लोकर आणि कोंबडीच्या पंखांपासून बनणार पशूखाद्य, वैज्ञानिकांना मोठं यश

भारत हा कृषिप्रधान (Agriculture) देश आहे. शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योगासाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं, यासाठी सरकार आणि विविध संशोधन संस्था प्रयत्नशील असतात. नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांमुळे दर वर्षी पशुपालकांना चाराटंचाईचा (Fodder Scarcity) सामना करावा लागतो.

  • Share this:
मुंबई, 18 सप्टेंबर : भारत हा कृषिप्रधान (Agriculture) देश आहे. शेतकऱ्यांना शेती आणि शेतीपूरक उद्योगासाठी प्रगत तंत्रज्ञान उपलब्ध व्हावं, यासाठी सरकार आणि विविध संशोधन संस्था प्रयत्नशील असतात. शेती कसताना शेतकऱ्यांना कमी श्रम आणि खर्चात अधिक उत्पन्न, उत्पादन कसं मिळवता येईल, या दृष्टिकोनातून असे प्रयत्न होत असतात. नैसर्गिक आपत्ती किंवा अन्य कारणांमुळे दर वर्षी पशुपालकांना चाराटंचाईचा (Fodder Scarcity) सामना करावा लागतो. चाराटंचाई उद्भवल्यास त्याचा थेट परिणाम जनावरांच्या आरोग्यावर, तसंच दुभत्या जनावरांच्या दुग्धोत्पादनावर होत असतो. यामुळे पशुपालकांचं आर्थिक नुकसान होतं. चाराटंचाई उद्भवू नये, तसंच चाराटंचाई उद्भवल्यास काय करावं, यासाठी संशोधन संस्था आणि संबंधित शासकीय विभाग पशुपालकांना सातत्याने मार्गदर्शन करत असतात. बाजारातलं पशुखाद्य (Animal Food) महाग असल्यानं त्याचा वापर करण्यावरही मर्यादा येतात. त्यामुळं रास्त दरात जनावरांसाठी पशुखाद्य उपलब्ध व्हावं याकरिता वैज्ञानिकांनी नुकतंच एका तंत्रावर संशोधन केलं. या संशोधनातून भारतीय वैज्ञानिकांनी मानवी केस, लोकर आणि कोंबडीच्या पंखांसारख्या प्रथिनयुक्त कचऱ्याचं खतांमध्ये (Fertilizers), तसंच पशुखाद्यामध्ये रूपांतर करण्याचं तंत्र विकसित केलं आहे. भारतीय वैज्ञानिकांनी मानवी केस, लोकर आणि कोंबडीच्या पंखांसारख्या प्रथिनयुक्त कचऱ्याचं खतांमध्ये रूपांतर करण्याचं एक किफायतशीर तंत्र (Technique) विकसित केलं आहे. भारतात दर वर्षी मोठ्या प्रमाणात मानवी केस, कोंबड्यांचे पंख आणि लोकरीपासून कचरा म्हणजेच अवशेष निर्माण होतात. हे अवशेष एक तर फेकून दिले जातात, जमिनीत गाडले जातात, त्यांचा जमीन भरावासाठी वापर होतो किंवा ते जाळून टाकले जातात. यामुळे प्रदूषणाचं (Pollution) प्रमाण वाढतं. तसंच सार्वजनिक आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता असते. त्यामुळे हरित वायू उत्सर्जनही वाढतं. हे अवशेष अमिनो अॅसिड आणि प्रथिनांचा मोठा स्रोत असतात. या अवशेषांचा वापर पशुखाद्य किंवा खतं म्हणून करता येऊ शकतो. सध्या वैज्ञानिक गुजरात येथील रेल्वोटेक टेक्नोलॉजीज प्रा. लिमिटेडच्या सहकार्यानं हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात राबवत आहेत. या तंत्रज्ञानामुळे बाजारात सध्या उपलब्ध असणाऱ्या द्रवरूप जैविक खतांच्या तुलनेत तिप्पट प्रभावी असलेली द्रवरूप जैविक खतं शेतकऱ्यांना स्वस्तात उपलब्ध होणार आहेत. मुंबई येथील इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नोलॉजीचे कुलपती प्रा. ए. बी. पंडित यांनी आपल्या विद्यार्थ्यांसमवेत केरॅटिन कचऱ्याचं रूपांतर पाळीव जनावरांसाठी अन्न आणि वनस्पतींसाठी खतांमध्ये करण्याचं तंत्र विकसित केलं आहे. हे नवीन पेटंट तंत्रज्ञान वापरण्यास सुलभ, पर्यावरणास अनुकूल आणि ऊर्जा कार्यक्षम आहे. यामुळे सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या द्रवरूप खतांच्या तुलनेत अमिनो अॅसिडयुक्त खतं किफायतशीर दरात उपलब्ध होतील. या संशोधकांनी कचऱ्याचं विक्रीयोग्य खतं आणि पशुखाद्यामध्ये रूपांतर करण्यासाठी प्रगत ऑक्सिकरणाचा वापर केला आहे. हायड्रोडायनॅमिक कॅव्हिटेशन नावाच्या तंत्राद्वारे प्रारंभिक प्रक्रियेनंतर केरॅटिनचं हायड्रोलिसिस केलं जातं. यात वाहत्या द्रवात बाष्पीभवन, बबल निर्मिती आणि बबल इम्प्लोशनचा वापर केला जातो. अशा रूपांतरणासाठी सध्या वापरल्या जाणाऱ्या रासायनिक आणि भौतिक पद्धतीत अधिक ऊर्जा वापरली जाते आणि ती रासायनिकदृष्ट्या धोकादायक असते. यात अनेक पद्धतींचा समावेश असल्यानं उत्पादनाची अंतिम किंमत वाढते. या तंत्राविषयी पथकाने केलेल्या आकडेवारीनुसार, मोठ्या प्रमाणात उभारलेल्या प्रकल्पात प्रति 1 टन कच्च्या मालावर प्रक्रिया करण्यासाठी येणारा खर्च बाजारात सध्या उपलब्ध असलेल्या उत्पादनाच्या तुलनेत 3 पट स्वस्त आहे. या नव्या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना विविध अवशेषांपासून पशुखाद्य आणि द्रवरूप खतं अगदी कमी दरात उपलब्ध होऊ शकतात.
First published: