एकाकीपणा जाणवतोय? स्मार्टफोन कंपनीकडे आहे मजेदार उपाय पण मोजावी लागेल किंमत

एकाकीपणा जाणवतोय? स्मार्टफोन कंपनीकडे आहे मजेदार उपाय पण मोजावी लागेल किंमत

कमालीचा एकटेपणा जाणवत असेल तर काय करावं? एका स्मार्टफोन ब्रँडकडे बहुधा या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु त्यासाठी किंमत मात्र मोजावी लागणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 5 नोव्हेंबर : संपूर्ण जग कोरोना महामारीच्या मध्यावर येऊन ठेपलं आहे. सोशल डिस्टन्सिंग अजूनही काळाची गरज ठरत आहे. बाहेर कुठे भटकंती, कुटुंबीय, मित्रांसोबत मौजमजा अजूनही आधीप्रमाणे तितकंस सोपं नाही. अशा वेळी कमालीचा एकटेपणा जाणवत असेल तर काय करावं? एका स्मार्टफोन ब्रँडकडे बहुधा या प्रश्नाचं उत्तर आहे. परंतु त्यासाठी किंमत मात्र मोजावी लागणार आहे.

सोशल मीडिया मार्केटिंगचा पुढचा टप्पा म्हणून चीनची स्मार्टफोन उत्पादक कंपनी वन प्लसने एकाकीपणा घालवण्यासाठी कोरोनाकाळात तुम्हाला सोबत करून देणारा एक मजेदार उपाय आणला आहे. “एकटेपणा जाणवतोय? घ्या दोन #OnePlus8Ts यामुळे तुम्हीच तुम्हाला कॉल करू शकाल.” असा मजकूर या ब्रँडने आपल्या फेसबुक पेजवर टाकलाय.

ही मजेदार पोस्ट लगोलग सगळ्या प्लॅटफार्मवर व्हायरल झाली आणि पाठोपाठ नेटिझन्सकडून गमतीदार प्रतिक्रियाही उमटायला लागल्या.

“मला कमालीचं निराश वाटत आहे. तुमच्याकडे काही उपाय आहे काय?” अशी विचारणा एका युजरने केली. त्यावर “#OnePlus8T घ्या, तुम्हाला बरं वाटेल” असं उत्तर वन प्लसने दिलं आहे.

स्मार्टफोन कंपनी मजेशीररित्या आपल्या अलीकडेच लाँच केलेल्या OnePlus8T या मॉडेलबद्दल माहिती देत आहे. या नव्या मॉडेल OnePlus8T मध्ये 120 हर्ट्झचा डिस्प्ले आहे. OnePlus8 च्या 90 हर्ट्झ डिस्प्लेला अपग्रेड केलेलं आहे. OnePlus 8T मध्ये Wrap Charge 30T वरून वेगवान असं Wrap Charge 65 करण्यात आलं आहे. मागील बाजूस क्वाड कॅमेरा सेटअपही यात आहे.

Published by: Karishma Bhurke
First published: November 5, 2020, 5:53 PM IST
Tags:

ताज्या बातम्या