मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

PUB-Gच्या तोडीस तोड FAU-G Mobile Game लवकरच लाँच होणार; असं करा प्री-रजिस्ट्रेशन

PUB-Gच्या तोडीस तोड FAU-G Mobile Game लवकरच लाँच होणार; असं करा प्री-रजिस्ट्रेशन

PUBG ला मिस करत असाल तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी FAU-G लवकरच लाँच होणार आहे. कधी होणार रीलिज, कसं करायचं प्री रजिस्ट्रेशन जाणून घ्या

PUBG ला मिस करत असाल तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी FAU-G लवकरच लाँच होणार आहे. कधी होणार रीलिज, कसं करायचं प्री रजिस्ट्रेशन जाणून घ्या

PUBG ला मिस करत असाल तर तुमचं मनोरंजन करण्यासाठी FAU-G लवकरच लाँच होणार आहे. कधी होणार रीलिज, कसं करायचं प्री रजिस्ट्रेशन जाणून घ्या

मुंबई, 08 डिसेंबर: पब्जी मोबाईल गेमवर (PUBG Mobile) भारतात बॅन आल्यानंतर बराच काळ लोटला नसला तरी त्याचा भारतीय प्रतिस्पर्धी असणारा FAU-G मोबाईल गेम लवकरच भारतात लाँच होण्याची शक्यता आहे. FAU-G कंपनी अजून तरी गेमची कोणतीही ऑफिशियल लाँच डेट घेऊन आली नसली तरी सोमवारी दिलेल्या वृत्तानुसार हा गेम डिसेंबरमध्येच लाँच करण्यात येईल, असे कळले आहे. FAU-G च्या मागे असलेल्या कंपनीने गूगल प्ले स्टोअरमध्ये (Google Play Store) आधीच नोंदणी सुरू केली आहे, त्यामुळेच लवकरच तो लाँच होईल असा अंदाज बांधला जात आहे. शिवाय, कंपनीने असेही म्हटले आहे की पूर्व-नोंदणी (pre-registration) सुरू झाल्याच्या अवघ्या 24 तासांतच 1 दशलक्षांहून अधिक पूर्व नोंदणी झाली आहे. ‘फियरलेस अँड युनाइटेड गार्ड्स’ (Fearless and United Guards) हे टायटल असलेला, एफएयू-जी मोबाईल गेम हा पब्जी मोबाईलला एक दमदार भारतीय पर्याय म्हणून समोर आणण्याच्या उद्दिष्टाने लाँच गेला जात आहे. अलीकडेच पब्जी मोबाईलसह आणखी 117 अ‍ॅप्ससह भारतात बंदी घातली गेली आहे. मंत्रालयाच्या सांगण्यानंतर अलीकडच्या काळात केंद्र सरकारने पब्जीवर बंदी घातली असून हे गूगल प्ले स्टोअर आणि अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअर (Apple App Store) या दोन्हीमधून तो काढून टाकण्यात आला आहे. एफएयू-जी भारतात लाँच झाल्यानंतर, सर्व अ‍ॅप स्टोअर्समधून हा गेम डाउनलोड केला जाऊ शकतो किंवा गेमर थेट ऑफिशियल वेबसाइटवरून याची एपीके फाइल डाउनलोड करू शकतात. परंतु, गेमची ऑफिशियल वेबसाइट सध्या तरी लाइव्ह झालेली नाही. FAU-G ची पूर्व-नोंदणी (pre-registration) कशी करावी? लेटेस्ट अपडेटनुसार, एफएयू-जी ची पूर्व-नोंदणी आधीच सुरू झाली आहे. यापूर्वीच एक दशलक्षांहून अधिक लोकांनी गेमसाठी पूर्व-नोंदणी केली आहे. पूर्व-नोंदणी गुगल प्ले स्टोअरमध्ये केली जाऊ शकते. FAU-G भारतात कधी लाँच होईल? जरी एफएयू-जीच्या प्रमोटर्सनी अजूनही गेमसाठी रिलीजची तारीख अधिकृतपणे जाहीर केलेली नाही, परंतु या वर्षाच्या समाप्तीपूर्वी हा गेम अधिकृतपणे लाँच होईल असा अंदाज वर्तवला जात आहे. एफएयू-जी गेम डाउनलोड कसा करावा? इतर कोणत्याही गेमप्रमाणेच, एफएयू-जी गेम सुद्धा लाँच झाल्यानंतर, ऑफिशियल वेबसाइटवर जाऊन आपण त्याची एपीके (APK) डाउनलोड करू शकता.
First published:

Tags: Apple, Pubg game

पुढील बातम्या