वाहनधारकांनो FASTag आजपासून पाहिजेच, जाणून घ्या कुठे मिळेल आणि कसा वापरायचा

वाहनधारकांनो FASTag आजपासून पाहिजेच, जाणून घ्या कुठे मिळेल आणि कसा वापरायचा

वाहनधारकांसाठी टोलनाक्यावर फास्टॅग आजपासून बंधनकारक असणार आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे.

  • Share this:

वाहनधारकांसाठी टोलनाक्यावर फास्टॅग आजपासून बंधनकारक असणार आहे. फास्टॅग हे एक रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटिफिकेशन डिव्हाइस आहे. याच फास्टॅगच्या मदतीने आता टोल भरायचा आहे. यामुळे कोणत्याही टोलनात्यावर कॅशमध्ये टोल वसूल केला जाणार नाही.

यााबाबत महामार्ग वाहतूक मंत्रालयाने म्हटलं आहे की, 1 डिसेंबरनंतर जर कुठली गाडी टोलनाक्यावरून जात असेल तर त्यासाठी फास्टॅग सक्तीचा आहे. फास्टॅग नसेल तर दुप्पट टोल वसूल केला जाणार आहे.

फास्टॅग कुठे मिळेल ?

तुम्हाला फास्टॅग खरेदी करायचा असेल तर त्याची किंमत 100 रुपये आहे. त्याशिवाय तुमच्या गाडीप्रमाणे वेगळा चार्जही द्यावा लागेल. यासाठी तुम्हाला SBI च्या बँकेत जाऊन पॉइंट ऑफ सेल वर जावं लागेल.

इथे तुम्हाला एक फॉर्म दिला जाईल. हा फॉर्म भरून KYC डॉक्युमेंट्ची फोटोकॉपी द्यावी लागेल. यामध्ये तुमच्या गाडीची RC, एक ID प्रूफ, अ‍ॅड्रेस प्रूफ आणि फोटो द्यावा लागेल.

तुम्हाला जर फास्टॅग रिचार्ज करायचा असेल तर SBI च्या अधिकृत वेबसाइटवर जाऊन फास्टॅग सेक्शनवर क्लिक करावं लागेल. या सेक्शनमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमचा मोबाइल नंबर, पासवर्ड आणि कॅप्चा की च्या मदतीने लॉग इन करा. लॉगइन केल्यानंतर तुमच्या गाडीचा पर्याय निवडा आणि रिचार्ज अमाउंट टाका. शेवटी पेमेंटचा पर्याय निवडून फास्टॅग रिचार्ज करा.

टोलनाक्यांवर टोल भरण्यासाठी भलीमोठी रांग असते. त्यातच कॅश देऊन टोल भरण्यातही बराच वेळ जातो. त्यामुळे आता गाडीला फास्टॅग लावण्याची ही सोय करण्यात आली आहे. 1 डिसेंबरपासून फास्टॅग सक्तीचा आहे. त्यामुळे वेळ वाचवायचा असेल आणि टोलचे दुप्पट पैसेही वाचवायचे असतील तर हा गाडीला हा फास्टॅग लावून घ्या.

Published by: Suraj Yadav
First published: December 15, 2019, 10:04 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading