मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

iPhone बनवणारी ही प्रसिद्ध कंपनी आता भारतात बनवणार इलेक्ट्रॉनिक कार; तीन Prototype मॉडेल केले सादर

iPhone बनवणारी ही प्रसिद्ध कंपनी आता भारतात बनवणार इलेक्ट्रॉनिक कार; तीन Prototype मॉडेल केले सादर

भारतीय बाजार काबीज करण्यासाठी जागतिक मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा लागलेली असताना आता iPhone बनवणाऱ्या फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीने भारतात इलेक्ट्रॉनिक कार बनवण्याची तयारी सुरू केली आहे.

    नवी दिल्ली, 22 ऑक्टोबर : भारतीय बाजार काबीज करण्यासाठी जागतिक मार्केटमध्ये जोरदार स्पर्धा लागलेली असताना आता iPhone बनवणाऱ्या फॉक्सकॉन (Foxconn) कंपनीने भारतात इलेक्ट्रॉनिक कार (Electronic Car in India) बनवण्याची तयारी सुरू केली आहे. त्यामुळं आता लवकरच भारतीय बाजारात इलेक्ट्रॉनिक कार येण्याची शक्यता आहे. फॉक्सकॉन कंपनी ही सध्या आयफोन बनवते. आता ती भारतात इलेक्ट्रॉनिक्स मार्केटमध्ये मोठी झेप घेणार आहे. फॉक्सकॉनने या कारसंदर्भात काही मॉडेलही शेयर केले आहेत. त्यानंतर त्या आपल्या या योजनेविषयी खुलासा केला आहे. कंपनीचे चेयरमन लियू यंग वे यांनी याविषयी बोलताना म्हटलंय की वे (Liu Young-Way) 2024 पर्यंत भारत, यूरोप आणि लॅटिन अमेरिकेत इलेक्ट्रॉनिक कार बनवण्याची आमची तयारी सुरू असून त्यावर आम्ही काम करत आहोत. त्यासाठी आम्ही जर्मनीतील काही ऑटो कंपन्याशी बोलणी करत आहोत. लियू यांनी याआधीही मॅक्सिकोत इलेक्ट्रॉनिक कार बनवण्याची योजना आखली होती. Passport काढण्यासाठी सरकारी Umang App करेल मदत, असं करा अप्लाय फॉक्सनचे चेयरमन ताइपे यांनी एका बिझनेस फोरमला संबोधित करताना या योजनेविषयी माहितीला दुजोरा दिला आहे. ते सर्वात आधी यूरोपमध्ये इलेक्ट्रॉनिक कार बनवणार आहे, त्यानंतर भारतात या कारचं निर्माण होईल. त्याचबरोबर या कंपनीने पुढील पाच ते सहा वर्षात या कारसाठी लागणाऱ्या सुट्या भागांचंही निर्माण केलं जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. सावधपणे गाडी चालवूनही धडकली तर...; अपघाताबाबत सर्वाच्च न्यायालयाचा मोठा निर्णय या इलेक्ट्रॉनिक कारचं उत्पादन हे भारतातील स्थानिक कंपन्यांशी भागिदारी करून केलं जाणार असल्याची माहितीही चेयरमन लियू यांनी दिली आहे. त्यामुळं आता भारताती ग्राहकांना लवकरच इलेक्ट्रॉनिक कार उपलब्ध होणार आहे. सध्या भारतात इलेक्ट्रॉनिक्स कारच्या बाजार हा फार तेजीत आहे. त्यामुळं भारत आता इलेक्ट्रॉनिक्स कारच्या उत्पादनाच्या बाबतीत जगात पाचव्या क्रमांकावर आला आहे. भारत सरकारने 2030 पर्यंत भारतातील ऑटो इंडस्ट्री ही संपूर्णरित्या इलेक्ट्रीक बनवण्याचं लक्ष्य ठेवलं आहे. त्यामुळं 2030 पर्यंत भारतातील ऑटो मार्केट 150 लाख कोटींवर पोहचण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
    Published by:Atik Shaikh
    First published:

    Tags: Car, Iphone, Technology

    पुढील बातम्या