WhatsApp आणि Instagramचं नाव बदलणार, ब्रँडिंगसाठी फेसबुकची नवी आयडिया!

फोटो शेअरिंगसाठी वापरण्यात येणारं इन्स्टाग्राम आणि सोशल मीडिया मेसेजिंग अॅप व्हॉटसअॅप यांच्या नावात बदल होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 5, 2019 04:05 PM IST

WhatsApp आणि Instagramचं नाव बदलणार, ब्रँडिंगसाठी फेसबुकची नवी आयडिया!

सोशल नेटवर्किंग साइट फेसबुकनं इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपला खरेदी केलं आहे. मात्र आतापर्यंत फेसबुकबद्दल कोणतीही माहिती या अॅप्सवर नव्हती.

इन्स्टाग्राम आणि व्हॉटसअॅपला रिब्रँड करण्याची योजना फेसबुक करत आहे. याची माहिती संबंधित अॅपवर काम करणाऱ्यांना दिल्याचं आता एका रिपोर्टमधून समोर आलं आहे.

फेसबुकच्या रिब्रँडिंगबद्दल पहिल्यांदा द इन्फर्मेशन या न्यूज पोर्टलवर रिपोर्ट प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर फेसबुकनं इन्स्टाग्राम आणि व्हाटसअॅपच्या नावात बदल होणार असल्याचं सांगितलं होतं.

लवकरच इन्स्टाग्रामचं नाव ‘Instagram from Facebook’ आणि व्हॉटसअॅपचं नाव  ‘WhatsApp from Facebook’करण्यात येणार आहे.

द व्हर्जने दिलेल्या वृत्तानुसार फोन आणि टॅब्लेटच्या होमस्क्रीनवर अॅप्सची नावे सध्यातरी तशीच राहतील. मात्र, पहिल्यांदाच अॅप इन्स्टॉल करणाऱ्यांना नवे नाव दिसेल.

Loading...

इन्स्टाग्रामवर आयओएस युजर्सना सेटिंग पेजवर खालच्या बाजूला Instagram from Facebook’ असं दिसत आहे. या वर्षी मार्च महिन्यात ही बाब समोर आली होती. त्याबद्दल एका युजरनं ट्वीट केलं होतं. इन्स्टाग्रामवर आयओएस युजर्सना सेटिंग पेजवर खालच्या बाजूला Instagram from Facebook’ असं दिसत आहे. या वर्षी मार्च महिन्यात ही बाब समोर आली होती. त्याबद्दल एका युजरनं ट्वीट केलं होतं.

इन्स्टाग्रामवर आयओएस युजर्सना सेटिंग पेजवर खालच्या बाजूला Instagram from Facebook’ असं दिसत आहे. या वर्षी मार्च महिन्यात ही बाब समोर आली होती. त्याबद्दल एका युजरनं ट्वीट केलं होतं.

फेसबुकनं याबाबत म्हटलं आहे की, आम्ही फेसबुककडून युजर्सना मिळणारी अॅप्स आणि सेवा याबद्दल स्पष्टपणा आणू इच्छित आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 5, 2019 03:44 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...