नवी दिल्ली, 4 जुलै : फेसबुकने (Facebook) काही युजर्सला आक्षेपार्ह किंवा फेक कंटेंट, तसंच हिंसक, द्वेषपूर्ण व्हिडीओ पाहिला असल्यास अशा युजर्सला इशारा देण्यास सुरुवात केली आहे. ट्विटरवर शेअर करण्यात आलेल्या एका स्क्रीनशॉटमध्ये एक नोटिस दाखवण्यात आली आहे, ज्यात एखादा व्यक्ती आक्षेपार्ह, फेक किंवा द्वेषपूर्ण कंटेंट (Harmful Extremist Content) पाहत असल्याचं समोर आल्यास, अशा युजर्सवर कारवाई केली जाऊ शकते असं सांगण्यात आलं आहे. जगातील सर्वात मोठं सोशल मीडिया नेटवर्क अधिक काळापासून खासदार आणि नागरिक हक्क समूहांकडून आपल्या प्लॅटफॉर्मवर अशा कंटेंटचा सामना करण्यासाठी दबावाखाली आहे, ज्यात 6 जानेवारी रोजी अमेरिकेत कॅपिटल दंगलीत अमेरिकी घरगुती आंदोलनही सामिल आहे, ज्यावेळी माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना पाठिंबा देणाऱ्या गटांनी अमेरिकी क्राँग्रेसला प्रमाणित करण्यापासून रोखण्याचा प्रयत्न केला होता.
फेसबुक याबाबत टेस्टिंग करत आहे. साईटवर कट्टरता रोखण्यासाठी एका जागतिक दृष्टीकोनातून हे टेस्टिंग सुरू आहे. हे टेस्टिंग फेसबुकवर अशा लोकांचं रिसर्च करत आहे जे लोक अशा अतिरेकी कंटेंटशी जोडलेले आहेत किंवा त्यांच्या संपर्कात आहेत, किंवा त्यांना एखाद्याला धोका असल्याची जाणीव आहे, अशा लोकांना मदत करणं तसंच याबाबत संशोधन सुरू आहे.
फेसबुकचे हिंसक आणि द्वेषपूर्ण गटांविरुद्ध कठोर नियम -
फेसबुकने हिंसक आणि द्वेषपूर्ण गटांविरुद्ध, द्वेष निर्माण करणाऱ्यांविरुद्ध आपले नियम कठोर केले आहेत. फेसबुककडून असा कंटेंट पाहणारे, पसरवणाऱ्यांची अकाउंट डिलीट केली जातात. फेसबुकच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या युजर्सचं अकाउंट यामुळे बंद केलं जातं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.