Facebook युजर्सला समस्या; अचानक लॉगआऊट होऊ लागले अकाउंट्स

Facebook युजर्सला समस्या; अचानक लॉगआऊट होऊ लागले अकाउंट्स

शुक्रवारपासून जे युजर्स साइन इन होते, ते लॉगआऊट झाले. त्यांना पुन्हा लॉगइन करावं लागलं. फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 जानेवारी : सोशल नेटवर्किंग साईट फेसबुकच्या (Facebook) अनेक युजर्सला काही समस्या येत होत्या. अनेक युजर्सला त्यांचं फेसबुक अकाउंट अचानक फेसबुक App मधून लॉगआऊट झाल्याचं दाखवत आहे. परंतु फेसबुकच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कॉन्फिगरेशन चेंजमुळे (Configuration Change) ही समस्या आल्याचं सांगितलं आहे.

फेसबुकच्या प्रवक्त्यांनी 'द वर्ज' ला (The Verge) केलेल्या एका ईमेलमध्ये सांगितलं की, 22 जानेवारी रोजी एका कॉन्फिगरेशन चेंजमुळे काही युजर्स आपल्या अकाउंटमधून अचानक लॉगआऊट झाले. आम्ही या प्रकरणाचा तपास केला असून ही समस्या सोडवली आहे. तसंच या असुविधेसाठी फेसबुककडून खेदही व्यक्त करण्यात आला आहे.

(वाचा - Cambridge Analytica विरोधात CBI कडून गुन्हा दाखल, फेसबुक डेटा चोरी केल्याचा आरोप)

शुक्रवारपासून जे युजर्स साइन इन होते, ते लॉगआऊट झाले. त्यांना पुन्हा लॉगइन करावं लागलं. फेसबुकने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर याबाबत माहिती दिली आहे.

(वाचा - Amazon, Flipkart सारख्या ई-कॉमर्स कंपन्यांना मोठा झटका; CAIT कडून कारवाईची मागणी)

आयफोनच्या युजर्सला लॉगआऊटची समस्या सर्वाधिक आल्याची माहिती आहे. ज्या फेसबुक युजर्सचं टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन लागू होतं, त्यांना लॉगइन करण्यासाठी समस्यांचा सामना करावा लागला. अनेक युजर्स पुन्हा लॉगइन करू शकत नव्हते.

Published by: Karishma Bhurke
First published: January 24, 2021, 6:29 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या