Home /News /technology /

Facebook वर दिसणाऱ्या अ‍ॅडमुळे हैराण आहात; या स्टेप्स करा फॉलो!

Facebook वर दिसणाऱ्या अ‍ॅडमुळे हैराण आहात; या स्टेप्स करा फॉलो!

हे सर्व एका क्लिकवर बंद करू शकता. यानंतर तुम्हाला फेसबुक अकाऊंट वापरताना कोणत्याही अ‍ॅड त्रास देणार नाहीत.

    मुंबई, 1 फेब्रुवारी : फेसबुक (Facebook) युजर्स अनेकदा सतत दिसणाऱ्या अ‍ॅडमुळे हैराण होतात. फेसबुकवर दिसणारे अ‍ॅड आणि फीडमुळे युजर्सना आपलं अकाऊंट वापरताना मनस्ताप होतो. पण तुम्हाला हे माहित आहे का?, तुम्ही हे सर्व एका क्लिकवर बंद करू शकता. यानंतर तुम्हाला फेसबुक अकाऊंट वापरताना कोणत्याही अ‍ॅड त्रास देणार नाहीत. पण यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. तुम्हीच ब्राऊज केलेल्या या अ‍ॅड आणि फीड तुमच्यासमोर येत असतात. हे तुम्ही ऑफ केल्यास तुमच्या अकाऊंटवर ते दिसणार नाहीत. यासाठी तुम्हाला फेसबुकमधील 'Clear History Tool'चा वापर करावा लागणार आहे. या टूलच्या मदतीनं तुम्हाला फेसबुकवरील ब्राऊजिंग डेटा डिलीट करणं शक्य आहे. ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी सर्व फेसबुक युजर्ससाठी हे नवीन टूल आणण्यात आलं आहे. सेटिंगमध्ये दिसणाऱ्या या टूलला ‘ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी’ असं ना देण्यात आल्याची घोषणा फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकरबर्ग यांनी एका ब्लॉग पोस्टमधून केली आहे. तुम्ही ज्या वेबसाईट्ससोबत आपला फेसबुक डेटा शेअर केला आहे तसेच ब्राऊजिंग केलेल्या साईट्सच्या आधारावर तुम्हाला अ‍ॅड सुचवले जातात आहेत, अशा सर्व ठिकाणी ‘ऑफ-फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी’ काम करेल, असंही त्यांनी सांगितलं. यावेळी, येणाऱ्या काळात आम्ही युजर्सच्या डेटा प्रायव्हेसीवर अधिक काम करणार आहोत, असंही यावेळी मार्क झुकरबर्ग यांनी आवर्जुन सांगितलं. आता तुम्हाला तुमचा फेसबुक डेटा कोणासोबत शेअर करायचा, हे तुम्ही या टूलद्वारे ठरवू शकता. यासाठी तुम्हाला पुढील स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. या आहेत स्टेप्स स्टेप 1 : फेसबुकच्या सेंटिगमध्ये जाऊन प्रायव्हेसी ऑप्शनवर क्लिक करा. इथे दिसणारा 'सेटिंग्स अँड प्रायव्हेसी' ऑप्शनखाली असणारा सेटिंग्ज सिलेक्ट करा. स्टेप 2 : यानंतर स्क्रॉल केल्यावर खाली ‘ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी’ दिसेल स्टेप 3 : या पेजवर ‘ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी’ची माहिती दिली असून याला मॅनेज करण्याचं ऑप्शनही इथे देण्यात आलं आहे. स्टेप 4 : ‘ऑफ फेसबुक अ‍ॅक्टिव्हिटी’ मॅनेज करण्यासाठी आणि सेटिंगमध्ये बदल करण्यासाठी तुमच्याकडे पासवर्ड मागितला जाईल. स्टेप 5: पासवर्ड टाईप केल्यानंतर तुमच्यासमोर तुम्ही, फेसबुक डेटा शेअर केलेल्या वेबसाईट्सची यादी येईल. जी ब्राऊजिंग हिस्ट्री तुमच्या फेसबुकवर सेव्ह आहे, ती देखील तुमच्यासमोर येईल. स्टेप 6: इथेच तुम्हाला क्लिअर हिस्ट्री ऑप्शन दिसेल. यानंतर तुम्ही त्या साईट्सवरून लॉग-आऊट होता ज्या वेबसाईट्सवर फेसबुकच्या मदतीनं लॉग-इन केले होते. स्टेप 7: यानंतर निळ्या रंगात दिसणाऱ्या ‘क्लिअर हिस्ट्री’ ऑप्शन सिलेक्ट करून आपला डेटा क्लिअर करा.
    Published by:Manoj Khandekar
    First published:

    Tags: Facebook

    पुढील बातम्या