फेसबुक, ट्विटर आणि गुगलवर लागणार कर, केंद्र सरकार घेणार निर्णय?

फेसबुक, ट्विटर आणि गुगलवर लागणार कर, केंद्र सरकार घेणार निर्णय?

फेसबुक, ट्विटर, गूगल जाहिरातीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर नफा कमावतात.

  • Share this:

मुंबई, 01 ऑगस्ट : सर्वाधिक वापरलं जाणारं सर्च इंजिन गूगल , सोशल मिडिया नेटवर्किंट साइट फेसबुक, मायक्रो ब्लॉगिंग साइट ट्विटर यासह नॉन रेजिडेंट टेक्नॉलॉजी कंपन्यांवर कर लागण्याची शक्यता आहे. त्यांच्या उत्पन्नाची आणि युजर्सच्या मर्यादेची पुनर्रचना करण्याच्या तयारीत केंद्र सरकार आहे. 20 कोटींपेक्षा जास्त उत्पन्न आणि 5 लाखांपेक्षा जास्त युजर्स असतील तर या कंपन्यांना स्थानिक पातळीवर कमावलेल्या नफ्यावर थेट कर भरावा लागणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

'सिग्निफिकंट इकॉनॉमिक प्रेझेन्स' या संकल्पनेच्या अंतर्गत हा कर लागू करण्यात येईल. गेल्या वर्षी अर्थसंकल्पात केंद्र सरकारने ही संकल्पना मांडली होती. याचा प्रस्ताव अर्थ मंत्रालयाला पाठवण्यात येणार आहे. प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर संबंधित मोठ्या कंपन्यांवर कर आकारणी केली जाणार आहे.

भारतात जाहिरातीच्या माध्यमातून परदेशी टेक्नॉलॉजी कंपन्या मोठ्या प्रमाणावर नफा कमवत असल्याचा आरोप होत आहे. नफ्याचे प्रमाण पाहता तुलनेने कर आकारणी कमी होते असेही म्हटले जात होते. यामुळेच या कंपन्यांवर कर आकारण्यावर विचार सुरू आहे.

फोन बंद असला तरी Whatsapp Web करणार काम!

मोबाइल फोनच्या बॅटरीचा स्फोट का होतो? कशी घ्याल खबरदारी?

स्मार्टफोनचं चार्जिंग सारखं संपतंय? बॅटरी टिकवण्यासाठी वापरा 'या' टिप्स

मुंबई लोकलमध्ये 'पोलडान्स' करत तरुणाची स्टंटबाजी, VIDEO व्हायरल

First published: August 1, 2019, 12:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading