Home /News /technology /

IT नियमाचा तडाखा! एकट्या फेसबुककडून 1.75 कोटी पोस्टवर कारवाई, तुम्ही ही चूक करत नाही ना?

IT नियमाचा तडाखा! एकट्या फेसबुककडून 1.75 कोटी पोस्टवर कारवाई, तुम्ही ही चूक करत नाही ना?

देशात लागू झालेल्या आयटी अॅक्टनुसार (IT Rules 2021) सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सनी धक्कादायक माहिती उघड केली आहे.

    नवी दिल्ली, 3 जुलै : सध्या देशात दिवसेंदिवस सामाजिक सलोखा बिघडत असल्याचे चित्र आहे. यामध्ये सोशल मीडियाचा (IT Rules 2021) मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. सोशल मीडियाच्या अनेक प्लॅटफॉर्मवरुन द्वेषपूर्ण सामग्री पोस्ट केली जात आहे. याची दखल आता आघाडीच्या सोशल मीडिया कंपनीनेच घेतली आहे. मेटा कंपनीच्या मालकीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकने (Facebook) मे महिन्यात भारतात 1.75 कोटींहून अधिक सामग्रीवर प्रक्रिया केली आहे. कंपनीने आपल्या ताज्या मासिक अहवालात म्हटले आहे की, मे महिन्यात त्यांनी भारतात 13 उल्लंघन श्रेणी अंतर्गत कारवाई केली आहे. अहवालात असे म्हटले आहे, की ज्यांच्या विरोधात कारवाई करण्यात आलेली आहे. त्यात छळ, दबाव, हिंसा किंवा ग्राफिक सामग्री, प्रौढ नग्नता आणि लैंगिक घडामोडी, मुलांना धोक्यात आणणारी, धोकादायक संस्था आणि व्यक्ती आणि स्पॅम या श्रेणींमध्ये येते. "कारवाई करणे म्हणजे फेसबुक किंवा इंस्टाग्राम वरून कोणतीही सामग्री काढून टाकणे किंवा काहींना त्रासदायक वाटू शकतील अशा प्रतिमा आणि व्हिडिओंना कव्हर करणे आणि चेतावणी जोडणे असा असू शकतो," असे अहवालात म्हटले आहे. Instagram कडून मे महिन्यात सुमारे 41 लाख पोस्ट्सवर कारवाई भारतावरील मासिक अहवालात असे म्हटले आहे की 1 मे ते 31 मे 2022 दरम्यान, Facebook ने विविध श्रेणींमध्ये 1.75 कोटी सामग्रीवर कारवाई केली आहे, तर मेटाचा इतर प्लॅटफॉर्म Instagram ने याच कालावधीत 12 श्रेणींमध्ये सुमारे 41 लाख सामग्रीवर कारवाई केली आहे. Hate speech : सोशल मीडिया वापरणाऱ्यांनी सावधान! कोणतीही पोस्ट शेअर करण्याआधी 'हे' वाचा मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी दर महिन्याला अनुपालन अहवाल प्रकाशित करणे अनिवार्य गेल्या वर्षी मे महिन्यात लागू झालेल्या नवीन IT नियमांनुसार, 50 लाखांहून अधिक वापरकर्ते असलेल्या मोठ्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्राप्त झालेल्या तक्रारी आणि केलेल्या कारवाईचा तपशील देणारे अनुपालन अहवाल दरमहा प्रकाशित करणे आवश्यक आहे. त्यात अशा सामग्रीची माहिती देखील आहे जी सक्रिय असताना काढून टाकली गेली आहे किंवा थांबवली गेली आहे. ट्विटरकडून 46,500 हून अधिक खाती निलंबित ट्विटर इंडियाच्या जून 2022 च्या पारदर्शकता अहवालात असे म्हटले आहे की 26 एप्रिल 2022 ते 25 मे 2022 या कालावधीत देशात 1,500 हून अधिक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यात म्हटले आहे की मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याबद्दल 46,500 हून अधिक खाती निलंबित करण्यात आली आहेत. हा डेटा भारतातून आलेल्या सामग्रीसह जागतिक कृतीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मे महिन्यात WhatsApp ने 19 लाखांहून अधिक भारतीय खाती ब्लॉक केली मेटा-मालकीच्या व्हॉट्सअॅपच्या अलीकडील अहवालात असे म्हटले आहे की प्राप्त झालेल्या तक्रारींवर कारवाई करत मे महिन्यात 19 लाखांहून अधिक भारतीय खाती ब्लॉक करण्यात आली होती.
    Published by:Rahul Punde
    First published:

    Tags: Facebook, Social media

    पुढील बातम्या