Home /News /technology /

Facebook तयार करतंय असं नवं टूल जे तुमचा मेंदूसुद्धा वाचणार

Facebook तयार करतंय असं नवं टूल जे तुमचा मेंदूसुद्धा वाचणार

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी तूप खायलाच हवं. नियमित खाल्ल्यास स्मरणशक्ती काढते आणि मानसिक आजार कमी होतात.

फेसबुकनं (Facebook) नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांना एका एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (artificial intelligence) टूलबाबत माहिती दिली.

    न्यूयॉर्क, 19 डिसेंबर : सोशल मिडीया नेटवर्किंग (social media) आता आपल्या जगण्याचा भाग झालंय. ट्विटर, फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर लोक आपल्या खासगी आणि सार्वजनिक आयुष्यातील क्षण शेअर करत असतात. त्यातही फेसबुक (Facebook) ही सोशल मिडीया साइट युजर्समध्ये खूप लोकप्रिय आहे. मात्र अधूनमधून सोशल मिडीया आपल्या खासगी अवकाशावर अतिक्रमण करत असल्याच्या चर्चा डोकं वर काढतात. आता अशीच एक चर्चेला तोंड फोडणारी धक्कादायक बातमी समोर आली आहे. फेसबुक आता असं एक साधन (टूल) विकसीत करत आहे, ज्याद्वारे त्याला मानवी मेंदूत (human brain) काय चाललंय ते वाचता येऊ शकेल. फेसबुकनं मंगळवारी आपल्या कर्मचाऱ्यांना एका  एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (artificial intelligence) टूलबाबत माहिती दिली. हे टूल मेंदू वाचायला मदतशील ठरेल. कंपनीचं म्हणणं आहे, की हे टूल एखाद्या मोठ्या लेखाला बुलेट पॉइन्ट्समध्ये विभागेल. यातून युजरला संपूर्ण लेख वाचण्याची गरज राहणार नाही. फेसबुक आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर करून एक असं टूल बनवत आहे, ज्यातून एका सेंसरची निर्मिती होईल. हे सेंसर मानवी मेंदूचे वाचन करण्यास सक्षम असतील. बझफीडच्या एका रिपोर्टनुसार, फेसबुकनं आपल्या हजारो कर्मचाऱ्यांसाठी हे टूल ब्रॉडकास्ट केलं आहे. या वर्षाअखेर होणाऱ्या फेसबुक एम्प्लॉइजच्या अंतर्गत बैठकीत कंपनीनं एआय असिस्टंट टूल TDLR सादर केलं, जे न्यूज आर्टिकलचा सारांश सादर करतं. याबाबात मार्च 2020 मध्येच कंपनीनं घोषणा केली होती. फेसबुकनं त्यावेळी 'न्युरल इंटरफेस स्टार्टप लॅब्स'चं अधिग्रहण केलं होतं. याअंतर्गतच कंपनी ब्रेन रिडिंगच्या प्रकल्पावर काम करत आहे. असं काम करेल टूल TDLR म्हणजे Too Long Didn't Read. हे टूल मोठमोठ्या लेखांना बुलेट पॉइंट्सच्या रुपात तोडेल. रिपोर्टनुसार, फेसबुकचे चीफ टेक्नॉलॉजी ऑफिसर माइक स्क्रॉपफेर यांनी या बैठकादरम्यान एका वर्चुअल रियालिटी बेस्ड सोशल नेटवर्क होरिजनबाबतही सांगितलं. यात युजर्स आपल्याच नव्या रुपासह गप्पा आणि हॅगआऊट करू शकतील.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Brain, Facebook, Social media

    पुढील बातम्या