Home /News /technology /

तुमचं Facebook प्रोफाईल चोरून कोण पाहतं? 'या' Trick ने जाणून घ्या त्याची संपूर्ण कुंडली

तुमचं Facebook प्रोफाईल चोरून कोण पाहतं? 'या' Trick ने जाणून घ्या त्याची संपूर्ण कुंडली

Facebook Representative Image

Facebook Representative Image

फेसबूक कोट्यावधी लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या देशात तर फेसबूकचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो.

    नवी दिल्ली, 13 जुलै: फेसबूक (Facebook) हे आपल्या आयुष्यातील अगदी आवश्यक घटक आहे. दूरवर असणारे, अनेक वर्षे संपर्कात नसलेले मित्र जोडून देण्यासाठी, आपले मत, विचार, आपल्या आयुष्यातील घडामोडी शेअर करण्यासाठी हा डिजिटल प्लॅटफॉर्म (Digital platform) अत्यंत उपयुक्त ठरला आहे. त्यामुळे बघताबघता फेसबूक कोट्यावधी लोकांच्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनला आहे. आपल्या देशात तर फेसबूकचा वापर प्रचंड प्रमाणात केला जातो. कोट्यवधी लोक फेसबूक वापरतात. सध्याच्या कोरोनाच्या काळात (Covid pandemic) प्रत्यक्ष गाठीभेटी कठीण झाल्यानं तर याचं महत्त्व आणखी वाढलं आहे. उत्तम साहित्य, कलाकौशल्याचे सादरीकरण याचादेखील आस्वाद इथं घेता येतो. त्यामुळं घरबसल्या उत्तम मनोरंजनही याद्वारे होतं. झी न्यूज इंडिया डॉट कॉमनं दिलेल्या माहितीनुसार, फेसबूकवर आपण मित्र, मैत्रिणी, कुटुंबातील सदस्य, ओळखीचे लोक यांच्याशी जोडलेले असतो. अर्थात आपल्या फेसबूक मित्र यादीत (Facebook Friend List) कोणाला प्रवेश द्यायचा कोणाला नाही याची मुभा आपल्याला असते. आपल्या मित्र यादीत एखाद्या व्यक्तीला समाविष्ट करायचे असेल तर सर्वसाधारणपणे त्याचं फेसबूक प्रोफाइल (Facebook Profile) बघून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली जाते. हीच प्रक्रिया आपल्याला एखाद्या व्यक्तीची फ्रेंड रिक्वेस्ट (Friend Request) येते तेव्हा केली जाते. मात्र फेसबूक खातं उघडताना काही अत्यावश्यक वैयक्तिक माहिती (Personal Information) देणं आवश्यक असतं. त्यामुळं लोकांची वैयक्तिक माहितीही काही प्रमाणात का होईना सर्वांना समजते. फेसबूकवर आपलं प्रोफाइल कोणीही बघू शकतो. पण तुम्हाला आपल्या प्रोफाइलला कोण भेट देतं हे जाणून घ्यायचं असेल तर तेही शक्य आहे. एका साध्या सोप्या प्रक्रियेनं तुम्ही हे जाणून घेऊ शकता. वाढत्या वीज बिलांमुळे हैराण असाल तर वापरा या ट्रिक, 50 टक्क्यांपर्यंत होईल बचत! लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवरच ही युक्ती वापरणं शक्य : आपलं प्रोफाइल कोण तपासत आहे हे शोधण्याची युक्ती वापरण्यासाठी तुम्हाला लॅपटॉप (Laptop) किंवा डेस्कटॉपची (Desktop) आवश्यकता आहे. मोबाइलवर (Mobile) याचा वापर करणं शक्य नाही. लॅपटॉप किंवा डेस्कटॉपवर खालील प्रक्रिया करून अवघ्या काही सेकंदात तुम्ही तुमच्या प्रोफाइलला भेट देणाऱ्या व्यक्तीची माहिती मिळवू शकता. - यासाठी आधी ब्राउझर उघडून फेसबूकमध्ये लॉग-इन (Log in) करा. - त्यानंतर तुमच्या प्रोफाइलवर जा. - राइट क्लिक करा. तिथं बरेच पर्याय दिसतील. परंतु आपल्याला View Page Source वर जावं लागेल. - यासाठी CTRL + U कमांडचा वापर करा. - नंतर CTRL + F करून BUDDY_ID शोधा. - त्यासमोर 15 अंक असतील, तो क्रमांक कॉपी करावा लागेल. - तो कॉपी केल्यानंतर, https://www.facebook.com/च्या पुढे तो क्रमांक टाकावा लागेल. - त्यानंतर, शोध घेतल्यानंतर, ज्या व्यक्तीनं आपलं प्रोफाइल पाहिलं आहे, त्याची माहिती आपल्यासमोर येईल. आजच्या काळात ऑनलाइन फसवणूकीचे प्रकार वाढल्यानं अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवरील आपली माहिती सुरक्षित ठेवणं अत्यावश्यक झालं आहे. आपल्या फेसबुक प्रोफाइल भेट देणाऱ्या व्यक्तींची माहिती तपासून तुम्ही त्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ शकता.
    First published:

    Tags: Facebook, Techonology

    पुढील बातम्या