मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Facebook App चं नवं फीचर, पाहा नव्या अपडेटमध्ये काय होणार बदल

Facebook App चं नवं फीचर, पाहा नव्या अपडेटमध्ये काय होणार बदल

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलबाबत नवं टेस्टिंग करत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलबाबत नवं टेस्टिंग करत आहेत.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुक (Facebook) व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलबाबत नवं टेस्टिंग करत आहेत.

नवी दिल्ली, 24 ऑगस्ट : सोशल मीडिया प्लॅटफॉर्म (Social Media) फेसबुक (Facebook) व्हॉईस आणि व्हिडीओ कॉलबाबत (Voice and Video Call) नवं टेस्टिंग करत आहेत. व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल फेसबुक अ‍ॅपमध्ये अ‍ॅड करण्याबाबत हे टेस्टिंग सुरू आहे. हे फीचर सध्या Facebook Messenger अ‍ॅपचा भाग आहे.

फेसबुकवर व्हॉईस आणि व्हिडीओ कॉल हे फीचर सध्या मेसेंजरचे (Facebook Messenger) फीचर्स आहेत. कंपनीने 2014 मध्ये अधिकृतरित्या मेन फेसबुक अ‍ॅपमधून हे फीचर हटवलं होतं. आता पुन्हा हे फेसबुक मेन अ‍ॅपमध्ये सुरू करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. अनेक देशांमध्ये व्हिडीओ आणि व्हॉईस कॉल फीचर टेस्ट करत असल्याचं फेसबुकने सांगितलं आहे.

Facebook युजर्सचा डेटा धोक्यात, या Apps मुळे अकाउंट होऊ शकतं हॅक

मेसेंजर (Facebook Messenger App) ऑडिओ आणि व्हिडीओ कॉलचा पर्याय देतं. परंतु आता फेसबुकच्या मेन अ‍ॅपवरच व्हिडीओ आणि व्हॉईस कॉल फीचर आल्यास, मेसेंजर हटवलं जाईल की नाही याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

कोणी तुमचं Facebook Account लॉगइन तर केलं नाही ना?असं तपासून करा हे सुरक्षित बदल

फेसबुकवरच हे दोन्ही पर्याय उपलब्ध झाल्यास, मेसेंजरची गरज जवळपास संपेल. म्हणजेच फेसबुकवर हे फीचर आल्यास कोणत्याही अ‍ॅपमध्ये स्विच न होता, सहजपणे व्हिडीओ आणि ऑडिओ कॉल करता येईल.

दरम्यान, फेसबुकमध्ये लॉग-इनसाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन (Two Factor Authentication) अतिशय सुरक्षित मानलं जातं. यात फेसबुक युजरच्या मोबाईलवर एक कोड पाठवतो. योग्य कोड भरल्यानंतरच नव्या अ‍ॅप किंवा ब्राउजरवरुन लॉग-इन करता येतं. यासाठी सर्वात आधी Security and Log in सेक्शनमध्ये जावं लागेल. इथे फेसबुक अकाउंटच्या सिक्योरिटीपासून संपूर्ण फीचर्स दिसतील. इथे मोबाईल नंबर टाकावा लागेल. त्यानंतर टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करता येईल.

First published:
top videos

    Tags: Facebook, Tech news