फेसबुकचा महाघोटाळा! डेटा गोळा करणाऱ्या हजारो अॅप्सवर बंदी

फेसबुकचा महाघोटाळा! डेटा गोळा करणाऱ्या हजारो अॅप्सवर बंदी

केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर फेसबुकला युजर्सची माफी मागावी लागली होती. तसेच त्यांना पाच बिलियन डॉलर्सचा दंडही झाला होता.

  • Share this:

कॅलिफोर्निया, 21 सप्टेंबर : फेसबुकने हजारांपेक्षा जास्त अॅप्सवर कारवाई केली आहे. युजरची माहिती मोठ्या प्रमाणावर गोळा करत असल्याच्या कारणावरून फेसबुकने हे पाऊल उचललं आहे. केंब्रिज अॅनालिटिका प्रकरणानंतर काही अॅप्स फेसबुक डेटाचा गैरवापर केला जात असल्याचं समोर आलं होतं.

फेसबुकच्या पाच कोटींहून अधिक युजर्सच्या माहितीचा वापर करून निवडणूकांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला होता. फेसबुकने सांगितलं की, 400 डेव्हलपर्सची चौकशी केल्यानंतर कंपनीने कारवाई केली आहे. ही चौकशी संपली आहे. लाखांहून अधिक अॅप्सपैकी काही हजार अॅप्स बंद करण्यात आली आहेत.

केंब्रिज अॅनालिटीका प्रकरण उघडकीस आल्यानंतर फेसबुकवर अनेकांना डेटा चोरीचा आरोप केला. यासाठी फेसबुकला माफीही मागावी लागली होती. याशिवाय पाच बिलियन डॉलरचा दंडही कऱण्यात आला होता. याआधी केंब्रिज अॅनालिटिकाने त्यांचे संपूर्ण काम आरोप झाल्यानंतर तात्काळ थांबवले होते. कंपनीने ब्रिटन आणि अमेरिकेत दिवाळं निघाल्याचं घोषित केलं होतं.

VIDEO: विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाल्यानंतर नाना पटोलेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Facebook
First Published: Sep 21, 2019 03:30 PM IST

ताज्या बातम्या