फेसबुकनं घेतला हा निर्णय, तुमचं आवडतं फीचर होणार बंद!

फेसबुकनं घेतला हा निर्णय, तुमचं आवडतं फीचर होणार बंद!

फेसबुकनं पोस्ट केल्यानंतर होणाऱ्या कमेंट आणि लाइक याबाबत निर्णय घेतला असून लवकच लाइकची संख्या इतर युजर्सना दिसणार नाही.

  • Share this:

नवी दिल्ली, 04 सप्टेंबर : सर्वात लोकप्रिय सोशल मीडिया नेटवर्किंग साइट फेसबुक लवकरचं सर्वांचं आवडतं फीचर बंद करणार आहे. फेसबूक आता लाइक काउंट फिचर हटवणार आहे. याबाबत फेसबुकनं मंगळवारी स्पष्ट केलं आहे. फेसबुकनं म्हटंल आहे की, आता पोस्टला किती लाइक आहेत हे मित्रांना आणि इतर युजर्सना पाहता येणार नाही.

फोटो, व्हिडिओ तसेच कमेंट यांना मिळणाऱ्या लाइकमुळे पोस्ट गंभीरपणे पाहणाऱ्यांची संख्या कमी होते. हे फीचर बंद केल्यास पोस्टमध्ये नेमकं काय आहे त्याकडं युजर्स लक्ष देतील. यासाठीच फेसबुकनं हा निर्णय घेतला आहे.

फेसबुकचं लाइक काउंट हे फीचर अनेकांना आवडत नाही. अनेकदा पोस्ट केल्यानंतर फोटोला किती लाइक आणि कमेंट आल्या याकडं लक्ष असतं. फेसबुकच्या आधी इन्स्टाग्रामनं व्हिडिओ पाहणाऱ्यांची आणि लाइक करणाऱ्यांची संख्या इतरांना दाखवणार नसल्याचं जाहीर केलं होतं. किमान सहा देशांमध्ये हा प्रयोग सुरु करण्यात येणार आहे. यामध्ये ज्यांचे अकाउंट आहे त्यांनाच किती लाइक्स आहेत ते पाहता येईल.

टेक ब्लॉगरने ट्विटरवर या फीचरची चाचणी सुरु असताना एक स्क्रीनशॉट काढला आहे. यामध्ये फोटोला किती लाइक आहेत हे दिसत नाही. सोशल नेटवर्कींग साइट फेसबुकच्या प्रवक्त्यांनीसुद्धा मंगळवारी म्हटलं की, फेसबुक पोस्टच्या लाइकची संख्या न दाखवण्यावर विचार सुरु आहे.

वाचा : Apple च्या 'या' निर्णयाचा भारतीयांना फायदा, स्वस्तात मिळणार iPhone

वाचा : बंपर धमाका! कार खरेदीवर एक लाख रुपयांपर्यंत सूट

VIDEO: पुन्हा सत्ता काबीज करण्यासाठी फॉर्म्युला ठरणार, युतीची चर्चा आजपासून सुरू

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 4, 2019 01:45 PM IST

ताज्या बातम्या