फेसबुक याच महिन्यात बंद करणार 'ही' सुविधा

फेसबुक याच महिन्यात बंद करणार 'ही' सुविधा

युजर्सना नाही करता येणार हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅटिंग

  • Share this:

मुंबई, 5 मे : फेसबुकवर 'हाउसपार्टी' नावाची एक ग्रुप व्हिडिओ चॅटिंग सुविधा आहे. जी उघडताच युजर्सना कोण-कोण ऑनलाईन आहे हे कळतं आणि ऑनलाईन असलेल्या हव्या त्या व्यक्तीसोबत व्हिडिओ चॅटिंग करता येतं. 'बोनफायर' या क्लोनिंग अॅपच्या माध्यमातून फेसबुकने ही सुविधा युजर्सना उपलब्ध करून दिली होती. मात्र, हे अॅप कायमचं बंद करण्याचा निर्णय फेसबुकने घेतला आहे.

फेसबुकने या अॅपचं टेस्टिंग 2017 मध्ये सुरू केलं होतं. एका वृत्तानुसार 'बोनफायर' हे क्लोन अॅप याच महिन्यात (मे 2019) बंद होणार असल्याची माहिती आहे. या अॅपच्या माध्यमातून ज्या काही चांगल्या गोष्टी आम्हाला उमजल्या, त्यांचा उपयोग भविष्यात लाँच होणाऱ्या अन्य गोष्टींसाठी आम्ही करू, असं फेसबुकने म्हटलं आहे.

नुकत्याच पार पडलेल्या वार्षिक नियोजन सभेत फेसबुकने उत्तम फिचर्स असलेल्या मॅसेंजर अॅपचं डेस्कटॉप व्हर्जन लाँच करणार असल्याची घोषणा केली. फेसबुकचं मॅसेंजर अॅप विंडोज आणि macOS या दोन्ही प्रणालींसाठी डेव्हलप करण्यात आलं आहे. यात ग्रुप मैसेजिंग, वीडियो चॅट, GIF पाठवण्याची सुविधा राहणार आहे. तुर्तास या अॅपटं टेस्टिंग सुरू असून, चालू वर्षातच ते लाँच करण्यात येणार असल्याचं फेसबुकने म्हटलं आहे.

First published: May 4, 2019, 6:20 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading