Home /News /technology /

Facebook युजर्स सावधान, चुकूनही करू नका अशी Comment; पडेल महागात

Facebook युजर्स सावधान, चुकूनही करू नका अशी Comment; पडेल महागात

फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेंट करणं महागात पडू शकतं. इतकंच नाही, तर जेलची हवाही खावी लागू शकते.

  नवी दिल्ली, 24 जानेवारी : इंटरनेटच्या (Internet) जमान्यात अनेकजण सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सचा (Social Media Platform) वापर करतात. फेसबुक (Facebook), इन्स्टाग्राम (Instagram) सर्वात पॉप्युलर प्लॅटफॉर्म आहे. तुम्हीही फेसबुक युजर (Facebook User) असाल, तर तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती आहे. फेसबुकवर एखादी आक्षेपार्ह कमेंट करणं महागात पडू शकतं. इतकंच नाही, तर जेलची हवाही खावी लागू शकते. सोशल मीडियाच्या वाढत्या वापरात सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सुरक्षित ठेवण्यासाठी प्रयत्न केले जातात. फेसबुकवर असे काही युजर्स आहेत, जे इतरांच्या पोस्टवर चुकीच्या कमेंट्स (Facebook Inappropriate Comment) करुन त्यांना बदनाम करण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करतात. अशा युजर्सच्या कमेंट्सवर फेसबुक कारवाई करू शकतं.

  हे वाचा - Alert! कोरोना बुस्टर डोसच्या नावाखाली फसवणूक, एक फोन आणि तुमचे पैसे गायब

  अशा कमेंट्स करू नका - एखाद्याच्या पोस्टखाली तुम्ही जातियवादी किंवा एखाद्या धर्माविषयी कमेंट (Caste and Religion Comments) केल्यास तुमच्यावर कारवाई होऊ शकते. कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही कोणाची बदनामी करत असाल, शिव्या-अपशब्द वापरत असाल किंवा कमेंट्समध्ये अश्लील फोटो पाठवत असाल, तर तुमच्या विरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्याशिवाय तुमच्या एखाद्या पोस्टवर, फोटोवर चुकीची कमेंट किंवा अश्लील फोटो कमेंटमध्ये आल्यास तुम्हीही त्या कमेंट करणाऱ्या युजरबाबत तक्रार दाखल करू शकता. फेसबुकवर प्रत्येक युजरकडे कोणत्याही कमेंटला रिपोर्ट करण्याचा ऑप्शन असतो. यामुळे युजर फेसबुकला चुकीच्या कमेंटबद्दल सूचना देऊ शकतो.

  हे वाचा - या 5 Appsमुळे रात्रीच्या झोपेवर होतोय भयंकर परिणाम,तुम्ही या लिस्टमध्ये नाही ना?

  तुम्ही केलेल्या पोस्टद्वारे एखाद्या व्यक्ती किंवा संस्थेविरोधात अपशब्दांचा वापर होत असेल, तर कायदेशीर कारवाईसह तुरुंगवास होऊ शकतो. तुमच्या पोस्टबाबतची माहिती IT सेलपर्यंत पोहोचल्यास कायदेशीर कारवाईला सामारं जावं लागू शकतं. तुमची एक चूक गंभीर गुन्ह्याअंतर्गत थेट जेलमध्ये पोहोचवू शकते.
  Published by:Karishma
  First published:

  Tags: Facebook, Tech news

  पुढील बातम्या