• Home
 • »
 • News
 • »
 • technology
 • »
 • Facebook Messenger वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता कोणीच ऐकू शकणार नाही तुमचं बोलणं

Facebook Messenger वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी, आता कोणीच ऐकू शकणार नाही तुमचं बोलणं

मेटा (Meta) आपल्या App फेसबुकच्या Messenger App साठी end-to-end encryption रोलआउट करण्यास सुरुवात करणार आहे. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी लागू होईल.

 • Share this:
  नवी दिल्ली, 10 नोव्हेंबर : मेटा (Meta) आपल्या App फेसबुकच्या Messenger App साठी end-to-end encryption रोलआउट करण्यास सुरुवात करणार आहे. हे एंड-टू-एंड एन्क्रिप्शन व्हॉइस आणि व्हिडीओ कॉलसाठी लागू होईल. त्याबाबत कंपनीचे CEO मार्क झुकरबर्ग यांनी फेसबुकवर घोषणा केली आहे. ग्रुप चॅट आणि ग्रुप ऑडिओ-व्हिडीओ कॉलसाठी एंड-टू-एंड एन्क्रिप्शन सुरु करण्यात येईल. यापूर्वी केवळ टेक्स्ट चॅटिंगसाठी हे फीचर उपलब्ध होतं. WhatsApp वर एंड-टू-एंड एन्क्रिप्शन लागू आहे. WhatsApp ने Google Drive किंवा इतर ठिकाणीही घेतला जाणारा बॅकअप एंड-टू-एंड एन्क्रिप्टेड केला आहे. आता हे फीचर फेसबुक मेसेंजरसाठी लागू होणार आहे.

  EXPLAINER : End-To-End Encryption असूनही WhatsApp Chats बाहेर कशी येतात?

  काय आहे End-to-end encryption - End-to-end encryption या फीचरमुळे मेसेज आणि कॉल केवळ युजर आणि युजरच्या कॉन्टेक्टमध्ये सुरक्षित राहतील. हे चॅट इतर कोणीही पाहू शकत नाही. WhatsApp देखील हे ऐकू, वाचू किंवा पाहू शकत नाही. End-to-end encryption मध्ये मेसेज एका डिजीटल लॉकद्वारे सुरक्षित केले जातात. हे मेसेज वाचण्यासाठी एका डिजीटल चावीची गरज असते आणि ही चावी केवळ मेसेज पाठवणाऱ्या आणि मेसेज रिसिव्ह करणाऱ्या व्यक्तीकडेच असते. या दोघांमधील चॅट त्यामुळेच इतर कोणी पाहू शकत नाही. हे आपोआप होत असून यासाठी कोणतीही Setting करावी लागत नाही.

  Gmail चे हे भन्नाट फीचर्स माहित आहेत का? या सुविधांसह मेल पाठवणं होईल अगदी सोपं

  समजा, तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपवर एखाद्याला hello असा मेसेज करता, त्यावेळी hello सेंड होताच, हा शब्द मशिनी कोडमध्ये बदलला जातो. म्हणजेच हा शब्द मशिनी भाषेत Encrypted होतो. दुसऱ्या एंडला, म्हणजेच ज्या व्यक्तीला हा मेसेज पाठवला जातो, तिथे हा 'डिक्रिप्ट' होतो. म्हणजेच पुन्हा हा कोड hello मध्ये बदलला जातो. ज्याने मेसेज पाठवला त्या व्यक्तीपासून ते ज्याला मेसेज पाठवला आहे त्या व्यक्तीपर्यंत मेसेजचा प्रवास 'कोड' रुपात होतो. मध्येच हा मेसेज कोणी हॅक करण्याचा प्रयत्न केल्यास, तो डिकोड करू शकत नाही. अशाप्रकारे व्हॉट्सअ‍ॅपचं End-to-end encryption युजर्सची गोपनीयता आणि चॅट्स, डेटाचं संरक्षण करतं.
  Published by:Karishma
  First published: