मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /Alert! जगभरात अनेक ठिकाणी FB मेसेंजर आणि Instagram डाउन

Alert! जगभरात अनेक ठिकाणी FB मेसेंजर आणि Instagram डाउन

फेसबुक मेसेंजर (Facebook messenger) आणि इस्टाग्रामची (Instagram) सेवा अनेक ठिकाणी विस्कळीत (Server shut Down) झाली आहे.

फेसबुक मेसेंजर (Facebook messenger) आणि इस्टाग्रामची (Instagram) सेवा अनेक ठिकाणी विस्कळीत (Server shut Down) झाली आहे.

फेसबुक मेसेंजर (Facebook messenger) आणि इस्टाग्रामची (Instagram) सेवा अनेक ठिकाणी विस्कळीत (Server shut Down) झाली आहे.

नवी दिल्ली, 10 डिसेंबर : संपूर्ण जगात फेसबुक मेसेंजर (Facebook messenger) आणि इस्टाग्रामची (Instagram) सेवा विस्कळीत (Server shut Down) झाली आहे. दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (Social Media) वापरकर्त्यांना (Users) संदेश पाठविण्यासाठी अडचणी येत आहेत. हे दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म फेसबुकचे मालक मार्क झुकरबर्ग (Mark zuckerberg) यांचे आहेत. या दोन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर करणाऱ्या वापरकर्त्यांसमोर बर्‍याच अडचणी येत आहेत. वापरकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, फेसबुक मेसेंजरवर 'सर्व्हरशी कनेक्ट होण्यास असमर्थ' अशाप्रकारचा संदेश येत आहे. तर इन्स्टाग्रामवर वापरकर्त्यांकडून संदेशही लोड होत नाही.

युरोप, जपान नंतर भारतात सेवा विस्कळीत

फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम वापरकर्त्यांच्या म्हणण्यानुसार, त्यांची सेवा सर्वप्रथम युरोपमध्ये विस्कळीत झाली. त्यानंतर जपानमधील सोशल मीडिया वापरकर्त्यांना अडचणी येऊ लागल्या. आता भारतातही फेसबुक मेसेंजर आणि इन्स्टाग्राम वापरण्यास अडचणी येऊ लागल्या आहेत.

फेसबुकने कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली नाही...

फेसबुक मेसेंजर आणि इंस्टाग्रामची सेवा बंद झाल्यानंतर अद्याप फेसबुककडून कोणताही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. इन्स्टाग्रामची मालकीही फेसबुक कंपनीकडेच आहे. त्यामुळे सोशल मिडीया फ्लॅटफॉर्म वापरण्यात येणाऱ्या अडचणींबाबत वापरकर्ते ट्वीटरवर आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

जगभरातील वेगवेगळ्या देशांत वापरकर्त्यांना या अडचणी येऊ लागल्या आहेत.

ही बातमी अपडेट होत आहे.

First published:

Tags: Facebook, Instagram