फेसबुकने केला हा बदल, आता तुम्हाला मोजावे लागणार पैसे?

सोशल मीडियावर सर्वाधिक फेसबुकचा वापर केला जातो. अजुनही ही सेवा मोफत आहे पण आता त्यासाठी पैसे मोजावे लागण्याची शक्यता आहे.

  • Share this:

सोशल मीडियावर सध्या सर्वाधिक फेसबुकचा वापर केला जातो. जगभरात याचे 2 अब्जहून अधिक युजर आहेत. दिवसेंदिवस फेसबुकच्या युजर्समध्ये वाढ होत आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये फेसबुकवर डेटा लीक केल्याचा आरोप कऱण्यात आला होता. त्यानंतरही फेसबुकची लोकप्रियता कमी झालेली नाही. आता फेसबुक सेवा देण्यासाठी पैसे आकारणार अशी चर्चा सुरू झाली आहे.

मोफत सेवा पुरवत असतानाही फेसबुकला जाहिरातीच्या माध्यमातून प्रचंड कमाई होते. युजर्सना मित्र आणि फॅमिलीसोबत जोडण्याचा पर्याय देताना त्यांचा डेटा गोळा करून इतर कंपन्यांशी शेअर केला जातो. त्या कंपन्या टार्गेट युजर्सना जाहिराती दाखवून व्यवसाय करते. याबदल्यात कंपन्या फेसबुकला मोठ्या प्रमाणावर पैसे देते.

फेसबुकने मेन पेजवर केलेल्या बदलानं युजर्स संभ्रमात पडले आहेत. यामुळं येत्या काळात फेसबुक पैसे घेणार का असा प्रश्न विचारला जात आहे. तर दुसरीकडं काहींचे म्हणणे आहे की, झुकेरबर्ग फेसबुकच्या बिझनेस मॉडेलमध्ये बदल करण्याच्या तयारीत असून यामध्ये पेड सबस्क्रिप्शन ऑफरचा समावेश असल्याची चर्चा आहे.

फेसबुकने सुरुवातीला त्यांच्या मेन पेजवर नेहमी पूर्णपणे मोफत असं म्हटलं होतं. आता त्यांनी ही टॅगलाईन हटवली आहे. साइन अप ऑप्शनच्या खाली 'It's Free and always will be' अशी टॅगलाईन होती. त्याच्याऐवजी आता 'It's quick and easy' असा बदल करण्यात आला आहे. फेसबुकच्या मेन पेजवर हा बदल दिसतो.

फेसबुक वापरण्यासाठी पैसे मोजावे लागणार का याबद्दल अद्याप कंपनीकडून माहिती देण्यात आलेली नाही. फेसबुक फ्री व्हर्जनपेक्षा पेड व्हर्जनमध्ये जास्त फीचर्स देण्याचा विचारही करू शकते. मात्र, सध्यातरी फेसबुकने कोणतीच माहिती दिलेली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Facebook
First Published: Aug 31, 2019 11:29 AM IST

ताज्या बातम्या