मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

फेसबुकने केला तब्बल 3 लाख लोकांचा डेटा लीक, भरावा लागणार कोट्यावधींचा दंड

फेसबुकने केला तब्बल 3 लाख लोकांचा डेटा लीक, भरावा लागणार कोट्यावधींचा दंड

फेसबुकची आणखी एक चोरी पकडली गेली. गोपनीयता कायदा मोडल्याच्या आरोपावरून भरावा लागणार कोट्यावधींचा दंड.

फेसबुकची आणखी एक चोरी पकडली गेली. गोपनीयता कायदा मोडल्याच्या आरोपावरून भरावा लागणार कोट्यावधींचा दंड.

फेसबुकची आणखी एक चोरी पकडली गेली. गोपनीयता कायदा मोडल्याच्या आरोपावरून भरावा लागणार कोट्यावधींचा दंड.

  • Published by:  Priyanka Gawde

सिडनी, 10 मार्च : फेसबुकची विश्वासार्हता दिवसेंदिवस कमी होत आहे. याआधी फेसबुकवरील डेटा लीक झाला होता, आता तब्बल 3 लाख युझरचा डेटा लीक झाला आहे. ऑस्ट्रेलियातील प्रायव्हसी रेग्युलेटरने तीन लाखाहून अधिक लोकांची माहिती विनापरवानगी राजकीय सल्लागार कंपनी केंब्रिज अ‍ॅनालिटिकला दिल्याचा आरोप फेसबुकवर केला आहे.

ऑस्ट्रेलियन माहिती आयुक्त एंजलीन फाल्क यांनी फेडरल कोर्टावर ‘तुमचं डिजीटल आयुष्य’ (This is your digital life) नावाच्या संकेतस्थळावर याबाबत माहिती दिली आहे. फाल्क यांनी राजकीय ट्रेंड शोधण्यासाठी फेसबुकवर केलेल्या सर्वेक्षणात 3 लाख 11 हजार 127 युझरची माहिती उघड करून गोपनीयता कायदा मोडल्याचा आरोप केला आहे.

वाचा-NASA ने अंतराळात पिकवली भाजी, पृथ्वीवर आणल्यावर काय झालं?

वाचा-...तर तुम्हाला 16 मार्चपासून ऑनलाइन पेमेंट करता येणार नाही

फाल्क यांनी, फेसबुकची रचना ही युझरचा वापर करून घेणे आणि त्यांच्या वैयक्तिक माहितीवर नियंत्रण ठेवता यावे यासाठी करण्यात आली होती. या खटल्यातील गोपनीयता कायद्याच्या प्रत्येक उल्लंघनास जास्तीत जास्त 1.7 दशलक्ष ऑस्ट्रेलियन डॉलर दंड होऊ शकतो. कोर्टाने प्रत्येकी 3 लाख 11 हजार 127 प्रकरणांकरिता जास्तीत जास्त दंड आकारला तर हा दंड 529 अब्ज ऑस्ट्रेलियन डॉलर असेल.

वाचा-WhatsApp च्या या ट्रिक्स फोन मेमरी वाचवतील आणि चॅटसुद्धा करता येईल सेव्ह

वाचा-जे फेसबुकला सापडलं नाही ते एका पुणेकराने शोधलं, मिळालं 40 लाखांचं बक्षीस

100 कोटी युजर्सचा डेटा धोक्यात

अमेरिकेच्या फेडरल ट्रेड कमिशनने 2014 आणि 2015 या काळात अशाच प्रकरचा डेटा लीक झाला होता. यावेळी तपासणीनंतर फेसबुकला गेल्या जुलैमध्ये 5 अब्ज डॉलर्सचा दंड ठोठावण्यात आला होता.

स्मार्टफोनच्या जमान्यात डेटा सुरक्षितता धोक्यात आली आहे. आता पुन्हा एकदा युजर्ससाठी मोठा धोका समोर आला असून सायबर सिक्युरीटी फर्म Which? ने 100 कोटींपेक्षा जास्त युजर्सचा पर्सनल डेटा हॅकर्सच्या निशाण्यावर असल्याचं म्हटलं आहे. गुगलकडून सध्या पाच पैकी दोन अँड्रॉइड स्मार्टफोन्सना अपडेट देत नाही. त्यामुळे युजर्सचा डेटा चोरी होण्याची शक्यता वाढली आहे. अँड्रॉइड डिव्हाइसला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी गुगलकडून सतत अपडेट दिले जातात पण जुन्या स्मार्टफोनवर आता हे अपडेट दिले जात नाहीत. यामुळे युजर्सच्या डेटासाठी धोक्याचा इशारा आहे. काही स्मार्टफोन्स आणि टॅबची चाचणी लॅबमध्ये करण्यात आली. त्यात असे टॅब आणि स्मार्टफोन हॅक करता येतात हे समोर आलं आहे.

First published:

Tags: Facebook