नवी दिल्ली, 10 सप्टेंबर : फेसबुकने (Facebook Inc) Ray-Ban सह पार्टनरशिप करत आपले पहिले स्मार्ट ग्लासेस Ray-Ban Stories लाँच केले आहेत. हे ग्लासेस Ray-Ban च्या EssilorLuxottica सह मिळून विकसित केले गेले आहेत. हे ग्लासेस घातल्यानंतर गाणी ऐकता येतील, फोटो काढण्यासह ते Facebook App वरही शेअर करता येतील. फेसबुकच्या या नव्या आणि भन्नाट प्रोडक्टची सध्या मोठी चर्चा आहे.
Ray-Ban Stories मध्ये 5 मेगापिक्सल डुअल इंटिग्रेटेड कॅमेरा देण्यात आला आहे. याद्वारे फोटोसह 30 सेकंदापर्यंतचे व्हिडीओ बनवता येऊ शकतात. यासाठी कॅप्चर बटण किंवा हँड्स फ्री Facebook Assistant व्हॉईस कमांड्सचा वापर करता येऊ शकतो. तसंच यात LED लाईट्स देण्यात आले आहेत. त्याशिवाय बिल्ट-इन ओपन ईयर स्पीकरही आहेत. Ray-Ban Stories नव्या Facebook View App शी पेअर करता येऊ शकतं.
मागील काही काळात फेसबुकवर डेटा शेअरिंगबाबत अनेक आरोप केले गेले. यादरम्यान या ग्लासेस आणि फेसबुक प्रायव्हसीबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना फेसबुकने यावर स्पष्टीकरण दिलं आहे. Ray-Ban Stories स्मार्ट ग्लासेसद्वारे युजरचा डेटा युजरच्या परवानगीशिवाय अॅक्सेस केला जाणार नसल्याचं कंपनीने म्हटलं आहे. युजरने स्मार्ट ग्लासेसद्वारे Facebook View App मध्ये शेअर केलेल्या कंटेंटचाही फेसबुक वापर करणार नसल्याचं सांगण्यात आलं आहे.
या डिव्हाईसमुळे युजर्सला फोटो-व्हिडीओ कॅप्चर करण्याचा, गाणी ऐकण्याचा, फोन कॉल करण्याचा वेगळाच अनुभव मिळेल अशी माहिती कंपनीने दिली आहे. Ray-Ban Stories ची किंमत 299 डॉलरपासून सुरू होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.