Home /News /technology /

Facebookमध्ये आता होणार बदल, बातम्यांसाठी नवे पर्सनलाईज्ड न्यूज फिचर

Facebookमध्ये आता होणार बदल, बातम्यांसाठी नवे पर्सनलाईज्ड न्यूज फिचर

Facebook feature

Facebook feature

हे नवे न्यूजबेस फिचर देखील युझर्सला आणि प्रकाशकांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

ब्रिटन,28 जानेवारी : आपल्या आसपास घडणाऱ्या घटना किंवा घडामोडींची माहिती तत्काळ आपल्यापर्यंत पोहोचावी, यासाठी वाचक, युझर्स निरनिरळ्या प्रसिध्दी माध्यमांच्या वेबसाईट, अ‍ॅपचा वापर करतात. वाचकांची हीच गरज लक्षात घेऊन फेसबुकने (Facebook) एक नवे फिचर (Feature) लाँच केले आहे. फेसबुकची  अनेक वैविध्यपूर्ण फिचर्स यापूर्वीच युझर्सच्या पसंतीला उतरली आहेत. त्यामुळे हे नवे न्यूजबेस फिचर देखील युझर्सला आणि प्रकाशकांना उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. फेसबुकने ब्रिटनमधील (Britain) युझर्ससाठी पर्सनलाईज्ड न्यूज (personalised News) नावाचे नवे फिचर लाँच केले आहे. या नव्या फिचरसाठी फेसबुक मोबाईल अ‍ॅप (Facebook Mobile App) मध्ये स्वतंत्र टॅब देण्यात आलेला आहे. या टॅबवर टॅप केल्यानंतर मोअर ऑप्शनमध्ये (More Option) जाऊन तीन लाईन्स असलेल्या आयकानवर टॅप केल्यावर वापरता येणार आहे. या टॅबमध्ये फेसबुक अल्गोरिदमच्या मदतीने युझर्सला त्याच्या पसंतीच्या महत्वाच्या बातम्या आणि पर्सनलाईज्ड न्यूज देण्यात येणार आहेत. जो कंटेंट या प्लॅटफार्मवर पहिल्यापासून उपलब्ध नाही, अशा कंटेंटसाठी प्रकाशकाला शुल्क देण्यात येत असल्याचे फेसबुकने म्हटले आहे. या नव्या फिचरमुळे प्रकाशकांना नव्या जाहिराती आणि सदस्यतेसाठी संधी मिळेल, असे सोशल मीडियातील (Social Media) तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

याबाबत फेसबुकने म्हटले आहे, की फेसबुक न्यूजवर 95 टक्क्यांहून अधिक ट्रॅफिक ही संयुक्त राज्य अमेरिकेतील असून, त्यांनी यावरील कंटेंट वाचलेला नाही,त्यामुळे ही आकडेवारी अंशतः त्यावर आधारित असेल. सोशल नेटवर्कच्या म्हणण्यानुसार, हे नवे उत्पादन म्हणजे बहुवार्षिक गुंतवणूक असून, त्यामाध्यमातून  मूळ पत्रकारिता नव्या वाचकांसमोर येईल आणि ज्या वृत्तसंस्था कमी प्रमाणात वाचकांसमोर येतात, त्यांनाही नव्याने वाचकांपर्यंत पोहोचता येईल.

हे देखील वाचा - TikTok ने भारतात बंद केला आपला व्यवसाय; 1000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढलं, मेलद्वारे दिली माहिती एका ब्लॉगमधील माहितीनुसार, वृत्तक्षेत्र किंवा बातमीक्षेत्रात आंतरराष्ट्रीय गुंतवणुकीच्या मालिकेची ही सुरुवात आहे. लोकांना त्यांच्या जीवनावर परिणाम करणाऱ्या किंवा त्यांच्या आसपास घडणाऱ्या घटनांची वृत्त स्वरुपात माहिती मिळावी यासाठी फेसबुक न्यूजची निर्मिती करण्यात आली आहे. महान राष्ट्रीय आणि स्थानिक पत्रकारितेचे संवर्धन आणि प्रकाशकांना अधिक उत्पन्नाची संधी मिळावी, यासाठी हा प्रयत्न असल्याचे या ब्लॉगमध्ये नमूद करण्यात आले आहे. https://hindi.news18.com/news/tech/facebook-launched-personalised-news-feature-in-uk-know-how-it-works-aaaq-3434344.html
Published by:news18 desk
First published:

Tags: Facebook, Mobile app, Social media, Social media app, Technology

पुढील बातम्या