मराठी बातम्या /बातम्या /टेक्नोलाॅजी /

आता फेसबुक देणार Google-Amazon ला टक्कर, मोफत देणार ही नवीन सेवा

आता फेसबुक देणार Google-Amazon ला टक्कर, मोफत देणार ही नवीन सेवा

फेसबुक (Facebook) हे सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे. आता फेसबुक क्लाऊड गेमिंगच्या (Cloud Gaming) जगात प्रवेश करण्यासाठी तयार झालं आहे.

फेसबुक (Facebook) हे सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे. आता फेसबुक क्लाऊड गेमिंगच्या (Cloud Gaming) जगात प्रवेश करण्यासाठी तयार झालं आहे.

फेसबुक (Facebook) हे सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे. आता फेसबुक क्लाऊड गेमिंगच्या (Cloud Gaming) जगात प्रवेश करण्यासाठी तयार झालं आहे.

    मुंबई, 27 ऑक्टोबर : फेसबुक (Facebook) हे सध्या सर्वात जास्त वापरलं जाणारं ॲप आहे. आता फेसबुक क्लाऊड गेमिंगच्या जगात प्रवेश करण्यासाठी तयार झालं आहे. गूगल स्टाडिया किंवा ॲमेझॉन लूनासारख्या ( Google Stadia or Amazon Luna) स्पर्धकांच्या स्टँडअलोन प्लॅटफॉर्म ऐवजी कंपनी थेट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर गेम्स आणण्यासाठी सज्ज झाली आहे. अमेरिकेतील काही मर्यादित युजर्ससाठी बीटा व्हर्जन ऑफ मल्टिपल टायटल्स उपलब्ध करण्यात आले आहे. ज्याचा वापर ते फेसबूक वेबद्वारे आणि अँड्रॉइडसाठी ॲपद्वारे करू शकतात. फेसबूक क्लाऊड गेमिंग हे सध्या ॲपलने घातलेल्या बंधनांमुळे iOS डिव्हाइसवर वापरता येणार नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. या ॲपबाबतीत बोलताना फेसबुकचे उपाध्यक्ष (Play) जेसन रुबिन (Jason Rubin) यांनी सांगितले की सुरुवातीला क्लाऊड सर्व्हिसवरील गेम हे युजर्सना फ्री खेळता येणार आहेत. त्याकरता कंट्रोलर सारखं कुठलंही हार्डवेअर विकत घेण्याची गरज त्यांना भासणार नाही. हे गेम्स फेसबुकच्या गेम टॅबमध्ये उपलब्ध होणार आहेत.‌ तसंच HTML5 इन्स्टंट गेम्स हे सुद्धा सध्या युजर्ससाठी उपलब्ध असतील. Asphalt 9 आणि idle role-playing game mobile legends: Adventure हे आधीपासूनच मर्यादित युजर्ससाठी उपलब्ध आहेत. लवकरच फेसबुक आणखी काही गेम उपलब्ध करून देणार आहे. जेव्हा युजर फेसबुक क्लाऊड गेम वरून Asphalt 9 वर स्विच करतील तेव्हा फेसबुक Log in द्वारे त्यांचा सर्व डेटा त्यांच्या अकाउंटला ट्रान्सफर होईल. (हे वाचा-'या' इलेक्ट्रिक स्कूटर देतील सिंगल चार्जमध्ये जबरदस्त मायलेज; जाणून घ्या किंमत) फेसबुकच्या एक्झिक्युटिव्हने दिलेल्या माहितीनुसार, फेसबुकचा क्लाऊड गेमिंगबद्दलचा दृष्टिकोन त्यांच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा "philosophically" वेगळा असणार आहे कारण, ते कुठलेही मोठे गेम आणण्यापेक्षा अगदी सोपे सहज आणि साधेपणाने खेळले जाणारे गेम फेसबुक ॲपमध्ये आणणार आहेत. तसंच भविष्यात कंपनी अजून वेगळे गेम ॲपमध्ये जोडणार असल्याचंसुद्धा त्यांनी सांगितलं. (हे वाचा-wifi मध्ये अडथळे येतात? या सोप्या ट्रिक्सनी इंटरनेट होईल सुपरफास्ट) काही काळापासून फेसबुक आपल्या प्लॅटफॉर्मवर इन्स्टंट गेम ऑफर करत आहे, आणि सुरुवातीच्या काळातच FarmVille सह HTML5 या टायटलचा युजर मोठा होता. कंपनीच्या मते नवीन फेसबुक लाईव्ह गेमिंग सेवा ही फेसबुक प्लॅटफॉर्मवर उपलब्ध सर्व गेमचा पुढचा टप्पा आहे. या वर्षाच्या सुरुवातीला कंपनीने लाँच केलेल्या फेसबुक गेमिंग ॲपवर क्लाऊड गेमिंग सेवा उपलब्ध होईल की नाही हे आताच सांगता येणार नाही. या प्लॅटफॉर्मबद्दल आणि तो जागतिक स्तरावर कसा उपलब्ध होईल याबद्दल फेसबूकने अद्याप काहीही जाहीर केलेलं नाही.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    पुढील बातम्या