तुम्ही शेवटचं SEX कधी केलंत? Facebook ला आहे सर्व माहिती

तुम्ही शेवटचं SEX कधी केलंत? Facebook ला आहे सर्व माहिती

तुम्ही जी अॅप वापरता त्यावरून कोणत्या प्रकारची माहिती घेतली जाते याची कल्पना तुम्हाला आहे का? Maya आणि MIA Fem ही दोन अॅप गोळा करतात खासगी माहिती.

  • Share this:

मुंबई, 11 सप्टेंबर : सोशल मीडिया नेटवर्कींग साइट फेसबुकच्या डेटा लीक प्रकरणाची गेल्या दोन वर्षांत अनेकदा चर्चा झाली आहे. त्यावरून मार्क झुकेरबर्गला स्पष्टीकरण द्यावं लागलं होतं. आता एका रिपोर्टमध्ये अशी माहिती समोर आली आहे की, लाखो महिलांची खासगी माहिती फेसबुकला आहे. ही माहिती पीरियड ट्रॅकिंग अॅप्सच्या माध्यमातून फेसबुकला मिळाली आहे. हे अॅप महिलांच्या खासगी गोष्टींची माहिती साठवून ठेवतो. यामध्ये पाळी कधी सुरु झाली, कधी बंद झाली. तिचा मूड आणि सेक्स याबद्दलची माहितीसुद्धा अॅप गोळा करते. यात शेवटी सेक्स कधी केलं होतं यासारखी माहिती अॅपकडे असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

Buzzfeed न्यूजने दिलेल्या माहितीनुसार फेसबुकने अॅपवरील डेटा टार्गेट अॅडसाठी वापरला आहे. यामध्ये Maya आणि MIA Fem या अॅपचा समावेश आहे. Maya हे अॅप तब्बल 5 मिलियन युजर्सनी डाउनलोड केलं आहे. तर MIA Fem हे अॅप 2 मिलियनवेळा डाउनलोड करण्यात आलं आहे.

Maya आणि MIA Fem पीरियड ट्रॅकिंग अॅप्स आहेत. यामध्ये अनेक खासगी प्रश्न विचारले जातात. ही सर्व माहिती फेसबुकला सॉफ्टवेअर डेव्हलपर किटच्या माध्यमातून शेअर केली जाते. यामधून सर्व डेटाचा वापर करून फेसबुक युजरला जाहिरात दाखवते. प्रायव्हसी इंटरनॅशनलला असं आढळून आलं आहे की, माया आणि मिया या दोन्ही अॅपवरून फेसबुकला डेटा पाठवला जात होता. अॅप इन्स्टॉल करताच सर्व डेटा फेसबुकला जातो.

माया युजर्सची अत्यंत खासगी माहितीसुद्धा कोणत्याही परवानगीशिवाय अॅपशी शेअर केली जाते. तर MIA Fem ने डेटा शेअर करण्यापूर्वी परवानगी घेतली आहे. मात्र कोणती माहिती घेतली जात आहे हे स्पष्ट केलेल नाही. एका युजरनं म्हटलं की, अॅप वापरणाऱ्याचा मूड, पिरियड, सेक्स लाइफ याची माहिती ट्रॅक करून जाहिरातींचा मारा केला जातो. यामध्ये काही इमोशनल अॅडसुद्धा असतात.

फेसबुकनं बजफीडला सांगितलं की, एसडीके पॉलिसीच्या नियमांचं उल्लंघनावर चर्चा करण्यासाठी ज्या अॅपने डेटा शेअर केल्याचा संशय व्यकत केला आहे त्यांच्याशी संपर्क साधण्यात आला आहे. मात्र अद्याप हे स्पष्ट झालेलं नाही की फेसबुकशिवाय इतर कोणत्या अॅपला कोणती माहिती शेअर केली आहे.

वाहतूक पोलिसाची मुजोरी! सर्वसामान्यावर दमदाटी करत मारली लाथ VIDEO VIRAL

Published by: Suraj Yadav
First published: September 11, 2019, 2:15 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading